नाशिक-नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांचा वाढदिवस नाशिक येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. शहर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, हितचिंतक, कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षाचे नेते, उदयोजक तसेच राष्ट्रवादी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्यातील कार्यकर्त्यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांचे अभिष्टचिंतन केले.
सर्वप्रथम भुजबळ कुटुंबीयांनी समीर भुजबळ यांचे औक्षण केले. यावेळीखा.समीर भुजबळ यांच्या मातोश्री हिराताई भुजबळ, पत्नी डॉ. शेफाली भुजबळ, कन्या भुवनेश्वरी आणि इतर कुटुंबीयांनी औक्षण केले. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व आशिर्वाद दिले.
कोरोनाच्या नियमांचे पालन करत नाशिक येथील भुजबळ फार्म कार्यालयात समीर भुजबळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी शहर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, हितचिंतक, कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षाचे नेते, उदयोजक, तसेच राष्ट्रवादी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राज्यातील कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. तसेच सोशल मिडिया, दूरध्वनी द्वारे शुभेच्छा स्वीकारल्या.