बिग बॉस मराठी सिझन तिसरा-“ BB College” : आदिश वैद्य बनला प्रोफेसर
मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालच्या भागात बिग बॉस सगळ्या सदस्यांना कॉलेजच्या सुवर्ण दिवसात घेऊन गेले आहेत आणि बिग बॉसनी जाहिर केली या आठवड्याची टीम असणार आहे “ BB College”. या अंतर्गत काल पार पडली नॉमिनेशन प्रक्रिया. “ सफर करा मस्तीने” या नॉमिनेशन कार्यात काल पाच सदस्य सेफ झाले – आविष्कार, उत्कर्ष, मीरा, गायत्री आणि जय. आणि घरातील बाकी सर्व आठ सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या आठवड्यात कोण घराबाहेर पडणार ? कोण सेफ होणार ? हे आठवड्याच्या शेवटी समजेलच !
BB College ही आठवड्याची थीम असून आविष्कार, स्नेहा, गायत्री, विशाल, विकास, जय, तृप्तीताई आणि मीनल हे या कॉलेजचे विद्यार्थी बनले आहेत तर मीरा, उत्कर्ष, आदिश, सुरेखाताई, सोनाली आणि दादुस बनले आहेत शिक्षक.या टास्क मध्ये धम्माल मस्ती तर येणारच आहे यात शंका नाही. आदिश वैद्य याने आज council मध्ये एक गुपित सांगितले आणि ते म्हणजे गायत्री दातारला कसे हसावायचे आणि त्याला जयने देखील साथ दिली. गायत्रीच्या हसण्याचा आवाज संपूर्ण बिग बॉस मराठीच्या घरात घुमला. या टास्कमुळे घरातील सगळे सदस्य एकत्र येऊन खेळणार असे दिसते आहे. यात काही ट्विस्ट तर नसेल ना ? जाणून घेण्यासाठी आजचा भाग बघावा लागणार आहे.
“आम्ही विकासला सांगितल होतं…” – जय
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन कार्य पार पडले. ज्यामध्ये घरातील पाच सदस्य सेफ झाले आणि बाकी सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले. कालपासूनच सुरेखा कुडची सदस्यांवर थोड्या नाराज असल्याचे दिसून येत आहे. जीपमध्ये बसण्याची संधी कोणत्या सदस्याला मिळेल यावरून टीम घेत असलेल्या निर्णयावर काल सुरेखा ताईंनी नाराजी व्यक्त केली आणि म्हणाल्या तुम्ही जे ठरवाल त्याला मी मत देईन. आज देखील जय त्याविषयीच सुरेखाताईंशी बोलताना दिसणार आहे. तो त्याचा मुद्दा मांडणार आहे.
जयने विचारले, “सुरेखाताई तुम्ही का नाही आलात ? तुम्ही येऊन जरी गेला असता तरी चाललं असतं. सुरेखा ताईंच म्हणण आहे, “मी तिथे यायचं, तुम्ही मला उतरवणार. त्यापेक्षा मी तुमच्यापासून दूर राहिलेली बरं ना. जय त्यांना मुद्दा समजावण्याचा प्रयत्न करणार आहे, “तुम्ही चुकीचचं बोलत आहात. सुरूवातीला येणं तुमचा भागच नव्हता. तुम्ही विकासला पण विचारा तो जेव्हा आत आला तेव्हा आम्ही डील केलं होतं याच्यानंतर दादुस येणार आणि नंतर तुम्ही येणार आणि हे डील झालं होतं. हवं तर त्याला आता विचारा आणि अजून एक होतं तुमच्यानंतर परत तो येणार”.