नाशिक – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे प्रदेश चिटणीस अंकुश अरुण पवार यांनी वाढदिवसानिमित्त कृष्णकुंज, मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
लहान मोठ्या सर्वांच्या अडी-अडचणीला धावून येणारे, आपल्या मनमिळावू स्वभावामुळे शहर व जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये‘आपला माणुस’म्हणून सर्वपरिचित असे मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी त्यांना आशीर्वाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, योगेश लभडे, उपशहराध्यक्ष सचिन सिन्हा, शहर संघटक हरीश गुप्ता, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष निकीतेश धाकराव, मनविसे जिल्हाध्यक्ष शाम गोहाड, मनविसे शहराध्यक्ष संदेश जगताप, चारुदत्त भिंगारकर, विजय शिंदे, सचिन सांगळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.