आजचे राशिभविष्य बुधवार, १३ ऑक्टोबर २०२१  

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन शुक्ल अष्टमी, दक्षिणायन शरद ऋतू. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस, महाष्टमी उपवास आहे”
नक्षत्र: पूर्वाषाढा (सकाळी १०.१९ पर्यंत) चंद्र राशी ‘धनु आणि मकर’
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) विशेष आनंददायी दिवस आहे. कामे मार्गी लागतील. उत्साही वाटेल.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) पूर्वार्ध अडचणीचा मात्र दुपारनंतर आर्थिक लाभ होतील. समाधानकारक कामे होतील. स्वप्ने साकार होतील.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मनपसंत जोडीदार मिळेल. मन प्रसन्न राहील. दुपार नंतर कामे रेंगाळतील. 
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मौल्यवान खरेदी होईल. भौतिक सुखे लाभतील. आर्थिक आवक चांगली होणार आहे.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) नेहमीपेक्षा वेगळा मार्ग निवडाल. तुमचे कौतुक होईल. सन्मान लाभतील.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) राजकरणापासून दूर रहा. क्रोध आवरा. गैरसमज टाळा. संध्याकाळ आनंदाची आहे.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाची कामे सकाळी पूर्ण करून घ्या. व्यवसायात यश मिळेल. संधी चालून येतील. 
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मनासारखा दिवस व्यतीत कराल. तडजोडी नकोत. कुटुंबास वेळ द्या.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मोकळा श्वास घेतल्याचा आनंद मिळेल. अडचणी दूर होतील. आवडत्या व्यक्ती सोबत संध्याकाळ व्यतीत कराल.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) इच्छा आकांक्षाना मुरड घालावी लागेल. सरकारी कामात अपयश येऊ शकते. काही काळ वाट बघावी लागेल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सकाळ आनंदाची आहे. कामाचा ताण वाढेल. महत्वाचे करार आज नकोत.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लाभदायक दिवस आहे. सर्व कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न राहील.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.