ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
भाद्रपद शुक्ल सप्तमी / दुपारी १.०२ नंतर अष्टमी.
वर्षा ऋतू. क्रोधीनाम संवत्सर.
“आज आनंदी दिवस आहे”
नक्षत्र – ज्येष्ठ / रात्री १०.४५ नंतर मूळ.
राशी – वृश्चिक / रात्री १०.४५ नंतर धनु.
*आज गौरी पूजन*.
रवी केंद्र चंद्र, चंद्र त्रिकोण गुरू, बुध प्रतियुती शनी.
१८ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर मंगळ आणि बुध या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही सभ्य आणि मोठ्या मनाचे आहात. तुम्ही तुमच्या मित्रांशी प्रामाणिक असतात. सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्यांमध्ये तुम्हाला यश मिळते. तुमची प्रकृती सुदृढ आहे. वक्तृत्व, स्वतंत्रपणा, हरहुन्नरीपणा हे तुमचे वैशिष्ट्ये आहेत. मोठेपणा, मानसन्मान, प्रतिष्ठा यांना तुम्ही अधिक महत्त्व देतात. जीवनातला खरा आनंद हा शिकवण्यात आणि अभ्यास करण्यात आहे, असं तुम्हाला वाटतं. इतरांना शिकवण्यात तुम्हाला आनंद मिळतो. तुम्हाला वडीलोपार्जित संपत्ती मिळू शकते. वैवाहिक जीवनातील समस्यांचा जीवनावर दबाव असण्याची शक्यता असते. तुमची स्मरणशक्ती चांगली असून भूतकाळातल्या घटना तुम्हाला स्पष्टपणे आठवतात. तुम्ही आक्रमक, धाडसी आणि तडफदार आहात. लढाऊ वृत्तीचे आहात. तुम्ही विनाकारण इतरांची कुरापत काढतात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून आपल्या विषयाची संपूर्ण माहिती तुम्हाला असते. स्वतःच्या कर्तृत्वावर तुमचा विश्वास असतो आणि ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. अनेकदा तुम्ही उतावळेपणाने नवीन नवीन योजनांमध्ये प्रवेश करतात. संभाषण कलेत तुम्ही प्रवीण आहात. तुम्हाला जीवनामध्ये अधिकार आणि मानसन्मान मिळतो. अनेकदा तुमची चूक तुम्ही मान्य करत नाहीत. तुम्हाला मैदानी खेळ आणि शक्तिशाली व्यायामाची आवड असते. तुम्हाला गरिबांवर दया करण्यात एक आनंद मिळतो. आजारी लोकांना तुम्ही स्वतःच्या इच्छाशक्तीने बरे करू शकतात. तुम्ही तापट आहात मात्र स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतात. तुमचे विचार ठाम असतात आणि त्यात नैतिकता असते. तुम्हाला तुमचे कुटुंब प्रिय असते आणि कायद्याचे पालन करणे आवडते. तुम्ही अत्यंत विश्वासू आहात आणि जबाबदारीच्या जागा सांभाळू शकतात. तुम्ही पोकळ दिमाख, गर्व, अहंकार, खोटा अभिमान टाळला पाहिजे तसेच इतरांवर टीका करताना शब्द काळजीपूर्वक वापरावेत.
व्यवसाय:- राजकीय क्षेत्र, डॉक्टर, केमिस्ट, लोखंडाशी संबंधित व्यवसाय, इंजीनियरिंग, खाण, बांधकाम, पुढारी.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.
शुभ रंग:- तांबडा, हिरवा आणि पिवळा.
शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
राशिभविष्य
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) भाग्याची साथ मिळेल. प्रवास घडतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. एखादी आनंदाची बातमी मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आर्थिक व्यवहार जपून करा. आरोग्याकडे लक्ष द्या.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल ग्रहमान आहे. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. मान-सन्मान मिळतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक लाभ होतील. कामातील अडथळे दूर होतील. प्रवास कार्यसाधक ठरतील. नवीन संधी मिळतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आनंददायी दिवस आहे. संततीकडून शुभ समाचार मिळेल. आर्थिक लाभ होतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. कामात यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यास दिवस चांगला आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) रात्री १०.४५ नंतर चंद्र तुमच्या राशीत येईल. भाग्याची साथ मिळेल. आर्थिक लाभ होतील. मनातील एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दिवस चांगला आहे. व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामाचा ताण जाणवेल. महत्त्वाची कामे विचारपूर्वक करा. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबासाठी वेळ द्याल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. नवीन संधी चालून येतील. धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)




