नाशिक– लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘कुसुमाग्रज नगरी’, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव नाशिक येथे दि. ३, ४ व ५ डिसेंबर रोजी होणार आहे.साहित्य संमेलनासंदर्भात झालेल्या महत्त्वाचा बद्दलांची माहिती देण्यासाठी व त्या अनुषंगाने चर्चेसाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट संमेलन प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, कार्यवाह सुभाष पाटील, समिती समन्वयक विश्वास ठाकूर यांनी भेट घेतली.
यावेळी संमेलनासाठी जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेले समन्वयक अधिकारी श्री. नितीन मुंडावरे हेही उपस्थित होते. बद्दलल्या परिस्थितीचा विचार करून व एकाच स्थळी निवासीव्यवस्थेसह आणि शक्य तितक्या बंदीस्त जागेत संमेलन होत असल्या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.या मुळे अधिक चांगल्या पध्द्तीने एकूण नियोजन व नियमन होईल.
या संमेलनामध्ये नाशिक जिल्ह्याला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा विशेष परिसंवाद आपण निश्चित पणे घेत आहोत हे स्पष्ट केले. साहजिकच नाशिक जिल्ह्याची एक आगळी वेगळी ओळख आणि त्याचे विकासातील योगदान सर्वांसमोर येणार आहे. प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल असे त्यांनी सांगितले.नाशिक महानगर पालिका आयुक्त कैलास जाधव साहेब ह्यांचीही भेट घेतली त्यांनीही योग्य सुचना दिल्या.