एसटी कर्मचाऱ्यांची ऐतिहासिक वेतनवाढ : संप मात्र कायम ; गुरूवारी होणार निर्णय

0

मुंबईएसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा म्हणून राज्य सरकारने त्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली असून साधारण: ज्यांना १२,५०० रुपये पगार आहे, त्यांना आता १७,५०० रुपये पगार मिळणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.त्यामुळे चेंडू आता संपकऱ्यांच्या कोर्टात असून त्यावर चर्चा करण्यात येत आहे. सरकारने दिलेल्या प्रस्तावावर आज चर्चा करणार आणि उद्या यावर भूमिका स्पष्ट करणार असं आमदार सदाभाऊ खोत यांनी जाहीर केलं आहे.

राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.राज्य सरकारच्या या प्रस्तावावर आता संपकरी चर्चा करणार असून यावर उद्या सकाळी निर्णय घेण्यात येईल असं आमदार सदाभाऊ खोत म्हणाले. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत झालेल्या बैठकीला आ. सदाभाऊ खोत आणि आ. गोपीचंद पडळकर उपस्थित होते. त्यानंतर राज्य सरकारने ही घोषणा केली आहे.

शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर अनिल परब हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेले. त्यावेळी या प्रस्तावाला अजित पवारांनी मान्यता दिल्याची माहिती आहे. त्यानंतर याला अंतिम मान्यता मिळवण्यासाठी अनिल परब हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. या पगार वाढीनंतर एसटी महामंडळ आणि राज्य सरकारवर वर्षाला  600 कोटींचा भार येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना समाधानकारक पगार वाढ देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.