नाशिक – कल्याण येथे दि. २४ ,२५ आणि २६ डिसेंबर २०२१ रोजी वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग इंडिया यांच्या मान्यतेने अमॅच्युअर पॉवर लिफ्टिंग असोसिएशन महाराष्ट्र आणि नमस्कार मंडळ याच्या वतीने राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा २०२१ चे आयोजन करण्यात आले होते .स्पर्धेमध्ये पॉवर लिफ्टर्स असो. ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट तर्फे नाशिक च्या संघात १९ खेळाडूंनी सहभाग घेऊन विशेष प्राविण्य मिळवले.
सब ज्युनिअर (१९ वर्षांखालील) पुरुष संघ
कुणाल पाळदे – रौप्यपदक , पुरणसिंग राठोर – रौप्यपदक तर दीक्षांत मोरये यांनी कांस्य पदक कमावले.
ज्युनिअर (२३ वर्षांखालील ) पुरुष संघ
जयेश झाल्टे – सुवर्णपदक,ललित खरोटे – सुवर्णपदक आणि महिला संघात कु.माधवी पोतदार – सुवर्णपदक तर कु. सायली बाहेर यांनी रौप्यपदक मिळवले.
सिनियर (४० वर्षांखालील ) पुरुष संघ
नरेंद्र कुलकर्णी – सुवर्णपदक, ज्ञानेश्वर म्हस्के – सुवर्णपदक, नरेश देवाडिगा- सुवर्णपदक,आशय रानडे – सुवर्णपदक, अमोल म्हसळे – रौप्यपदक, जितेंद्र राजपुत – रौप्यपदक, अजय देसाई – रौप्यपदक, तर ज्ञानेश्वर जरे यांनी कांस्यपदक मिळवले
मास्टर-१ (५० वर्षांखालील ) महिला संघ
डॉ नमिता परितोष कोहोक यांनी सुवर्णपदक कमावले .
ज्ञानेश्वर म्हस्के यांनी सिनियर संघात सर्वोत्तम शक्तीत्तोलन करून मानाचा स्ट्रॉंग मॅन ऑफ महाराष्ट्र २०२१ हा मानाचा किताब देखील मिळवला व नाशिकचे आणि महाराष्ट्रातले नामांकित खेळाडू होण्याचा बहुमान कमावला.
सर्व खेळाडूंना नाशिक अससोसिएशनचे अध्यक्ष विनोद गांगुर्डे उपाध्यक्ष साजिद मन्सूरी याचे मोलाचे सहकार्य लाभले तर आशय रानडे यांनी प्रशिक्षण दिले.