नाशिक – नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.मुंबईहून परतल्या नंतर कोरोनाची लक्षणे जाणवल्याने त्यांनी चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले आहे.
आपल्या ट्विट मध्ये त्यांनी म्हंटले आहे ‘आज कोरोनाची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वानी सतर्क राहावे. व लक्षणे आढळ्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी.
लवकरच मी आपल्या सेवेत पुन्हा रुजू होईल सर्वानी काळजी घ्यावी. शासनाच्या नियमांचे पालन करा ! असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये आवाहन केले आहे.
आज कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी सतर्क रहावे. व लक्षणे आढळल्यास तात्काळ कोरोना चाचणी करुन घ्यावी,ही
नम्र विनंती 🙏
लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईल.सर्वांनी काळजी घ्या, शासनाच्या नियमांचे पालन करा !— Hemant Tukaram Godse (@mphemantgodse) January 5, 2022