केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार कोरोना पॉझिटिव्ह

0

नाशिक- खासदार हेमंत गोडसे यांच्यानंतर आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी आणि काळजी घ्यावी. कोरोना नियमांचे पालन करुन स्वतःचे संरक्षण करावे असे आवाहन भारती पवार यांनी केले आहे.

भारती पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आणि मुंबईत बैठका घेतल्या होत्या. तसेच भारती पवार यांनी १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ केला होता. यावेळी भारती पवार अनेकांच्या संपर्कात आल्या होत्या.

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गोडसे केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यासोबत बैठकांना उपस्थित राहिले होते. मुंबई आणि नाशिकच्या दौऱ्यातही हेमंत गोडसे केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यासोबत होते. कार्यक्रम आणि दौऱ्यानंतर गोडसेंचा कोरोना अहवाल पहिला पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर आज डॉ. भारती पवार यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.