
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अधिक ज्येष्ठ कृष्ण सप्तमी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
⏰ राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज दुपारी ३.०० नंतर चांगला दिवस आहे.”
🌙 चंद्रनक्षत्र – धनिष्ठा / सकाळी ७.५६ नंतर शततारका.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ. (वैधरुती योग, विष्टी करण)
🔭 चंद्र त्रिकोण बुध.
🔭 चंद्र केंद्र हर्षल.
🪔 राशिभविष्य (Marathi Rashi Bhavishya)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) लाभ स्थानी चंद्राचा प्रभाव आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे. दुपारनंतर नवीन योजना यशस्वी ठरतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) व्यवसायात जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढू शकतात. संयम आणि शिस्त राखल्यास यश मिळेल. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) भाग्याची साथ लाभेल. चंद्र-बुध त्रिकोणामुळे बौद्धिक क्षमता वाढेल. लेखन, शिक्षण आणि संवाद क्षेत्रातील व्यक्तींना लाभ मिळेल. प्रवासाचे योग संभवतात.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) अष्टमस्थानी ग्रहप्रभावामुळे आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार जपून करा. गुप्त लाभाची शक्यता आहे. दुपारनंतर मानसिक तणाव कमी होईल. आध्यात्मिक विषयात रुची वाढेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) सप्तम स्थानी चंद्र आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या चर्चा सकारात्मक होतील.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) कामाचा ताण वाढेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. दुपारनंतर अडथळे कमी होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पंचम स्थानी चंद्र आहे. संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. प्रेमसंबंधात यश लाभेल. कला आणि सर्जनशील क्षेत्रात प्रगती होईल. गुंतवणुकीतून लाभ संभवतो.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) घरगुती वातावरणात काही बदल जाणवतील. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. दुपारनंतर मानसिक समाधान मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. चंद्र-बुध योगामुळे संवाद कौशल्य प्रभावी ठरेल. प्रवासाचे योग संभवतात. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) आर्थिक लाभाचा दिवस आहे. बोलण्याच्या कौशल्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कुटुंबीयांसोबत आनंददायक वेळ जाईल. नवीन खरेदीचा योग संभवतो.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. नवीन योजना आणि कल्पना यशस्वी ठरतील. चंद्र केंद्र हर्षल योगामुळे अचानक लाभदायक संधी मिळू शकते. दुपारनंतर ग्रहमान अधिक अनुकूल राहील.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) खर्च वाढण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. काही जुन्या गोष्टींचा विचार मनात येईल. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. संयमाने वागल्यास दिवस समाधानकारक जाईल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)



