मुंबई – कलर्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या तुझ्या रूपाचं चांदन मालिकेला प्रेक्षकांचा ऊतम प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत काही दिवसांआधीच “दत्ता”ची एंट्री झाली. रोहित निकम ही भूमिका साकारत असून त्याच्या लुकची चर्चा सगळीकडेच आहे. नक्षत्राला नरकच्या दारातून खेचून, नक्षत्राचं दु:ख कसे करेल, तिचं रक्षण कसं करेल हे मालिकेत बघायला मिळणार आहे. दत्ता आणि नक्षी आता संकट अडकले असून ते या संकटातून कसे बाहेर पडतील हे लवकरच कळेल.
मालिकेमध्ये मयूर मोरे याची भूमिका आपल्या सगळ्यांचा लाडका सुशांत शेलार साकारात आहे. तर आता मालिकेमध्ये अजून एक नवीन एंट्री होणार आहे आणि ती म्हणजे महेश्वरी यांची ही भूमिका सुरेखा कुडची साकारणार आहे. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, आतापर्यंत तुम्ही मला बर्याच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. याचसोबत कलर्स मराठीवर्ल बिग बॉस मराठी पर्व तिसरेमध्ये तुम्ही मला भरभरून प्रेम दिले. आणि या घरातून बाहेर पडल्यावर मी आता पुन्हाएकदा येते आहे तुमच्या भेटीला एका नव्या भूमिकेत. दत्ताच्या आईची ही भूमिका असून महेश्वरी पाटील ही भूमिका करताना मला मनापासून खूप आनंद होतो आहे. या भूमिकेत एक वेगळेपणा आहे कारण ही स्त्री राजकीय क्षेत्रामध्ये आहे.विषय थोडा वेगळा आहे तुम्हांला हे बघताना नक्कीच कळेल.”