हरिअनंत,नाशिक
शनिची साडेसाती आरंभ होण्यापूर्वी आपण सावध होणे अतिमह्त्वाचे आहे, शनीची साडेसाती म्हणजे आपण जीवनात कळत- नकळत केलेल्या चांगल्या- वाईट कर्माची अतिशय शिस्तबद्ध परीक्षा, या शनीच्या साडेसातीच्या परीक्षेत कुठल्याही प्रकारची हेरफेर किंवा कॉपी करता येत नाही. शनीच्या चाणाक्ष नजरेतून आपण काहीच लपवू शकत नाही.शनी परीक्षा घेण्याच्या बाबतीत अतिशय कठोर आहे.
शनी विषयी आपण नेहमी एक गोष्ट लक्ष्यात ठेवली पाहिजे; शनी मुद्दाम कुणालाही त्रास देत नाही.उगाच, गंमत म्हणूनही शनिविषयी थट्टा करू नये. पाठीमागच्या लेखात मी म्हणालो शनी आपल्या राशीत येण्यापूर्वी सावधानतेचा इशारा देतो, सावध करतो. तो कुणाला ही गाफील ठेवून कुणावर न सांगता गुपचूप येत नाही. शनी हा कर्माचा न्यायाधीश आहे. त्याच्या न्यायात कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो आणि शनी भेदभाव मुळीच करीत नाही. तो आदर करतो स्त्रीचा, सद्गुरूचा गुरू हा मीन राशीचा राशी स्वामी एप्रिल महिन्यात शनीचे राशी परिवर्तन होतंय मीन राशीला साडेसाती सुरू होतेय चार महिन्यासाठी .मात्र या चार महिन्याच्या साडेसातीत मीन राशींच्या लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
अन्यायकारक केलेले कर्म शनीला मुळीच आवडत नाही. गुरू एकावेळी माफ करू शकतो पण शनी गुरू स्वामी असलेल्या राशींच्या व्यक्तीला केलेल्या शनीने घेतलेल्या निर्णयात कुणीही बदल करू शकत नाही. मात्र गुरूची सेवा उत्तमोत्तम असेल तर नक्कीच शनी शिक्षेत थोडी सूट देतात. मीन राशींच्या व्यक्तींनी आता अतिशय सावध रहाण्याची वेळ जवळ येऊन ठेपलीय.
मीन राशीवर एप्रिल मध्ये सुरू होणाऱ्या साडेसातीचा परिणाम ,शनीचा इशारा आरंभ झालाय त्याची जाणीव निश्चित मीन राशींच्या व्यक्तीला होत असणार या होणाऱ्या जाणीव, इशाऱ्यानेच मीन राशींच्या व्यक्तींनी सावध होऊन आपल्या गुरुची सेवा अतिशय श्रद्धेने करावी, सावधानतेने आपल्या माता-पित्याचा,वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर करा. आपलं डोकं अतिशय शांत ठेवा कारण शनी साडेसातीत प्रवेश करताच व्यक्तीच्या डोक्यात प्रवेश करताच सर्व प्रथम व्यक्तीची चिडचिड होते .आणि चिडचिड होताच (क्रमशः) भाग-१५०
शुभम भवतु …
मीन राशीच्या साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव सावधानता, आजार, व्यवसाय, आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘विनामूल्य मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत