आजचे राशिभविष्य शनिवार, ८ जानेवारी २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष शुक्ल षष्ठी उत्तरायण हेमंत ऋतू.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस आहे”
चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा
चंद्र मीन राशीत आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आध्यत्मिक प्रगती होईल. आत्मिक समाधान लाभेल. प्रवासात/खर्चात वाढ होईल.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे.  मन प्रसन्न राहील. नवनवीन मित्र मंडळी भेटतील.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामानिमित्त प्रवास घडेल. संवाद आणि भाषणे यावर जोर द्यावा लागेल. वरिष्ठ खूष होतील. 
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नात्यातून लाभ होतील. अचानक धनलाभ संभवतो. दूरचे प्रवासाचे बेत आखले जातील. 
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आरोग्य सांभाळा. विश्रांती घ्या. महत्वाचे करार आज नकोत. पती/पत्नी चा सल्ला मोलाचा ठरेल.
 
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) शत्रूपिडा जाणवेल. भागीदारी व्यवसायात  लक्ष द्या. जोडीदाराला समजून घ्या. 
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. घरी पाहुणे येतील.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  शब्दास मान मिळेल. मौल्यवान खरेदी कराल. अपत्यांशी संवाद साधा. 
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) शेती संबंधित कामे मार्गी लागतील. अत्यंत आनंदी दिवस आहे. दिवस आनंदात घालवाल.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अत्यंत सुखाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. संधी चालून येतील.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) खर्चात वाढ होणार आहे. प्रवासात त्रास संभवतो. शब्दास मान मिळेल. आश्वासन देताना जपून द्या.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) समाधान लाभेल. आत्मविश्वास वाढेल. आध्यत्मिक उन्नती होईल. प्रवास कार्यसाधक होतील.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.