महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्षा साधना तोरणे यांचे निधन 

0

नाशिक – महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्षा सौ. साधना सुधाकर तोरणे वय ८१ यांचे वृद्धापकाळाने काल शुक्रवार दि.७ जानेवारी रोजी  रात्री दुःखद निधन झाले. त्या ज्योतिष शास्त्री, डेफ अँड डंबची पदवी अशा उच्च विद्या विभूषित होत्या. मुंबई,पुण्यात अनेक वर्ष मराठीच्या प्राध्यापिका होत्या. पुणे, नाशिक येथील विविध समाजसेवी संस्थामध्ये त्या पदाधिकारी होत्या. तेजस्विनी महिला संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या. महिला हक्क संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी असताना संस्थेला अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा समाजकार्यासाठी असलेला पुरस्कार  मिळाला होता.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयचे निवृत्त संचालक सुधाकर तोरणे यांच्या त्या पत्नी तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांच्या त्या मातोश्री होत्या. सातत्याने वृत्तपत्रीय लेखन, बालनाट्याच्या दिग्दर्शिका, महिला सबलीकरणासाठी अनेक विवीध उपक्रम त्यांनी राबवले होते.

शनिवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या गोविंद नगर, नाशिक येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांची अंतिम यात्रा निघेल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.