अतुलशास्त्री भगरे यांच्या ‘गुरुजी आयुर्वेदचा’ शुभारंभ

0

नाशिक (प्रतिनिधी) – बदलते जीवन आणि कोरोना सारखे साथ रोग यांच्या पार्श्वभूमीवर गुरुजी आयुर्वेदच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य राखण्याचे मौलिक कार्य घडेल आणि समाजाला उपयुक्त अशी सेवा दिली जाईल.’ असा विश्वास शंकराचार्य आणि साधुसंत तसेच महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ज्योतिषविषयक कार्यक्रमांमुळे प्रसिद्धीस आलेले येथील ज्योतिषी व याज्ञिक अतुलशास्त्री भगरे यांच्या ‘गुरुजी आयुर्वेद’ चा शुभारंभ येथील हॉटेल एस एस के मध्ये संकेश्वर करवीर पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू अभिनव विद्याशंकरजी महाराज, महापौर सतीशनाना कुलकर्णी, अमळनेर व पंढरपूरच्या संत सखाराम महाराज संस्थानचे  प्रसाद महाराज, भालोद गुजरात येथील आत्रेय आश्रमाचे शरदचंद्र प्रतापे महाराज, तसेंच राजौरी संस्थानचे अमृत महाराज जोशी आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील लोकप्रिय कलाकारांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाला.

Atul Shastri Bhagre's 'Guruji Ayurveda' Launching
अतुलशास्त्री भगरे

अतुलशास्त्री भगरे यांनी आयुर्वेद हा निसर्गनिर्मित असून मानवाला त्याच्याशिवाय पर्याय नाही. विविध राशी आणि त्यांना अनुसरून साबण आणि औषधे  अनेक जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली असून ती उपयुक्त ठरतील. संत महंतांचे आशीर्वाद आणि युवा कलाकार व जनता यांच्या सहकार्यातून प्रकल्प यशस्वी होईल.’असा विश्वास अतुलशास्त्री भगरे यांनी व्यक्त केला.अखिलेश भगरे हे कंपनीचे व्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहेत.

प्रारंभी दीपप्रज्वलन, धन्वंतरी पूजन, शांतीमंत्र पठण करण्यात आले त्यामुळे मंगलमय वातावरण निर्मिती झाली.यावेळी तितिक्षा तावडे, आशुतोष गोखले, सिद्धार्थ बोडके, ऋतुजा बागले, विदिशा म्हसकर, अनघा भगरे, नुपूर सावजी, धनंजय वाबळे, प्रकल्पास सहकार्य करणारे डॉ. दाणी, डॉ. मानकर, अमोल दायमा, चंद्रकांत जोशी, महेश पाटील, ह. भ. प. माधवदास राठी महाराज आदींसह सहकार्यांचा सत्कार करण्यात आला. धर्मक्षेत्र नाशिकच्या या प्रकल्पास उपस्थित साधुसंतांनी भरभरून आशीर्वाद दिले.

कार्यकारी संचालक मोहिनी भगरे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन मानसी देशमुख यांनी केले. कार्यक्रमास शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.