आजचे राशिभविष्य सोमवार, ४ एप्रिल २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्र शुक्ल तृतीया. वसंत ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी  ९.००आ
ज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस आहे. *गौरी तृतीया, तीज*
चंद्र नक्षत्र – भरणी
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- तुमची परीक्षा बघणारा दिवस आहे. क्रोध टाळणे उत्तम. यश मिळेल. स्पर्धेत पुढे जाल. राजकारणात यश मिळेल. सरकारी कामात प्रगती होईल.  कामाच्या ठिकाणी दबदबा वाढेल.
वृषभ:- कर्जे मंजूर होतील. पैशांची तजवीज होईल. दानधर्म करण्यास चांगला कालावधी आहे. व्यसने टाळा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
मिथुन:- आर्थिक लाभ होतील मात्र त्यासाठी काही काळ वाट बघावी लागेल. घरातील जेष्ठ व्यक्तींकडून मोलाचा सल्ला आणि अनेक आशीर्वाद मिळतील. सौख्य लाभेल.
कर्क:- घरात कुरबुरी होऊ शकतात.  संमिश्र दिवस आहे. गुंतवणुकीतून लाभ होतील. गुरू सन्निध लाभेल.
सिंह:-  महत्वाची कामे आज पूर्ण करा. खरेदी होईल. विरोधक पराभूत होतिल.  स्पर्धेत यश मिळेल. उच्च शिक्षणात प्रगती होईल. योग्य निर्णय घ्याल.
कन्या:- जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल. शेअर्स मधून फायदा होऊ शकतो. उद्योग व्यवसायात वृद्धी होईल. दीर्घकालीन नफा मिळेल.
तुळ:- कामाची गडबड राहील. काही महत्वाचे निर्णय आज घ्यावे लागतील. योग्य सल्ला घ्या. व्यसने आणि प्रलोभने टाळा.
वृश्चिक:- आर्थिक प्रगती होईल. जोडीदाराकडून किंवा सहकाऱ्याकडून मत्सर त्रास जाणवेल. शेतीची कामे पुढे सरकतील. जमिनीच्या व्यवहारातून लाभ होतील.
धनु:-  संततीला समजून घ्या. आर्थिक लाभ होतील. नात्यातून मदत मिळेल. पराक्रम गाजवाल. धाडसी निर्णय घ्याल. घरात संवाद साधा.
मकर:- खाणी संबंधित कामे मार्गी लागतील. वेळ दवडू नका. घरात लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
कुंभ:- प्रगतीचा दिवस आहे. मना सारखी आवक होईल. कामाचा उरक आवश्यक आहे. वेगाने वाटचाल कराल. काही कामे रेंगाळतील.
मीन:- निराश होऊ नका. उपासना करा.  चिकाटी सोडू नका. कामाचे स्वरूप पूर्णपणे समजावून घ्या.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.