इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नॅशनल असेंब्लीचे अधिवेशन तहकूब करण्यात आले आहे. इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वासाचा प्रस्ताव उप सभापतींनी फेटाळला आहे.अविश्वास ठराव हा परकीय षड्यंत्राचा भाग असल्याचा निर्णय सभापतींनी दिला.त्यांनी मतदान करू दिले नाही.त्याला सभागृहात विरोधक कडाडून विरोध करत आहेत.
काही वेळापूर्वीच इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदानासाठी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये कामकाज सुरू झाले होते. यावेळी पंतप्रधान इम्रान खान उपस्थित नव्हते. पण नॅशनल असेंब्लीच्या कामकाजानंतर काही वेळातच उपसभापती यांच्याकडून हा अविश्वासचा प्रस्ताव घटनाबाह्य ठरवण्यात आला आहे.
याआधी पंतप्रधान इम्रान खान यांनी राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांची भेट घेतली होती. इम्रान खान आज पुन्हा पाकिस्तानी जनतेला संबोधित करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.दरम्यान, पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, ‘निवडणुका लोकशाही मार्गाने व्हाव्यात. मी पाकिस्तानच्या जनतेला निवडणुकीची तयारी करण्याचे आवाहन करतो असे हि इम्रान खान म्हंटले आहे. .
स्पीकरने इम्रानचे म्हणणे ऐकून घेतले
इम्रान खान यांनी आरोप केला होता की, त्यांना सत्तेतून बेदखल करण्याची कारवाई परकीय कारस्थानाचा परिणाम आहे. नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांनीही हे मान्य केले. अविश्वास ठराव फेटाळतानाही त्यांनी हाच युक्तिवाद केला. आम्ही तुम्हाला सांगतो की, त्रासलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी रविवारचे मतदान स्वीकारू शकत नाही, असे सुचवले होते. तो म्हणाला, “संपूर्ण प्रक्रियाच बदनाम असताना मी निकाल कसा स्वीकारू?” इम्रान खान शनिवारी म्हणाले, “लोकशाही नैतिक अधिकारांवर काम करते.या संगनमतानंतर कोणता नैतिक अधिकार शिल्लक आहे?”
Pakistan National Assembly Deputy Speaker rejects the no-confidence motion against PM Imran Khan, declares it unconstitutional
(Source: PTV Parliament) pic.twitter.com/iDuaAIGlPJ
— ANI (@ANI) April 3, 2022