Delhi Fire : दिल्लीत अग्नितांडव : ३० जणांचा होरपळुन मृत्यू

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत

0

नवी दिल्ली –दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळ एका तीन मजली व्यावसायिक इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ३० जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. २८ जण जखमी असून २९ जण बेपत्ता आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीची माहिती मिळताच इमारतीत काम करणाऱ्यांचे कुटुंबीय आपल्या कुटुंबीयांच्या शोधात इकडे तिकडे फिरत आहेत. आग नियंत्रणात आणली आहे. परंतु कुटुंबीयांचा आक्रोश सुरु आहे.

दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्थानकाजवळ एका तीन मजली व्यावसायिक इमारतीला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात आली आहे. पण या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश अजूनही सुरूच आहे, काल संध्याकाळपासूनच काही लोकं आपल्या कुटुंबीयांच्या शोधात आहेत. त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. आतापर्यंत १०० लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र इमारतीमध्ये सध्या ३० ते ४० लोकं अडकल्याची शक्यता असल्याचे चीफ फायर ऑफिसर अतुल गर्ग यांनी सांगितले.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १०० कर्मचाऱ्यांची बचाव टीम घटनास्ठळी तैनात करण्यात आली होती. आगीच्या घटनेची माहिती मिळताच २७ अग्रिशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. फायर डिपार्टमेंटची एक टीम इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सर्च ऑपरेशन करत आहे. बचाव करताना २ कर्मचाऱ्यांचा देखील होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत

दिल्लीतील मुंडका मेट्रो रेल्वे स्थानकाजवळील तीन मजली इमारतीला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना दिल्ली सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केली आहे. केजरीवाल यांनी शनिवारी सकाळी घटनास्थळी भेट दिल्यानंतर ही घोषणा केली.

कंपनीच्या मालकाला अटक

दिल्लीचे पोलीस उपायुक्त समीर शर्मा यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की तीन मजली व्यावसायिक इमारतीमध्ये कंपन्यांची कार्यालये आहेत. डीसीपीच्या म्हणण्यानुसार, आग इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून सुरू झाली, जिथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि राउटर बनवणाऱ्या कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!