आम्ही शिवसेनेतच आहोत, सेनेला पुढे नेऊ, एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया

1

गुवाहाटी – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.असं असलं तरीही आजही ते शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी ट्विटर द्वारे केले आहे.

राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले.असं हि एकनाथ शिंदे यांनी ट्विटर वर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील घडामोडींना वेग आलाय. पुढील ४८ तासांत  बंडखोर शिंदे हे मुंबईत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यपालांना  छोट्या पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचं पत्र देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आता नेमकं काय घडणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. तर चहुकडे हिच चर्चा आहे. बंडखोर एकनाथ शिंदे महाराष्ट्रात येणार असल्यानं वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.त्यामुळे मुंबईतील अनेक भागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर दुसरीकडे आज देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्ली गेल्यानं सत्तास्थापनेच्या हलचालींना वेग आल्याची सूत्रांची माहिती आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] Shinde Nashik News शिवसेना (ठाकरे गट)मध्ये नाशिकमधून जोरदार खळबळ माजली आहे. एकीकडे उपनेते […]

Don`t copy text!