नवी दिल्ली – मोबाईल मध्ये दिवसेंदिवस बदल होतांना दिसत आहेत मोबाईल हे केवळ संपर्काचं साधन न राहता आता ते स्टेटस सिंबॉल बनलं आहे. अमूक एखाद्या ब्रँडचा मोबाईल तुमच्याकडे असेल तर तुम्ही उच्चभ्रू वर्गातील अशी गणनाही अनेकदा होताना पाहायला मिळते. मोबाइलला मध्ये नवनवीन प्रकार आणि नवनवीन सुविधा बाजारात उपलब्ध होत आहेत. दररोज यात काही ना काही बदल होत असल्याचं चित्र आहे. आता 4G नेटवर्क सुद्धा 5G होणार आहे. त्यामुळे जे स्मार्ट फोन वापरतात त्यांना फास्ट इंटरनेट सुविधा मिळणार आहे.
नुकतेच ‘नथिंग फोन वन’ हा मोबाईल पारदर्शक अशा नव्या डिझाइनमध्ये दाखवण्यात आला. या मोबाईलचं बॅक म्हणजेच रिअर पॅनल डिझाईन सर्वांत वेगळं व भुरळ घालणारं आहे. ट्विटर अकाउंटवर वाला अफशर युजरकडून हा स्मार्टफोन दाखवण्यात आला. ‘आज तक हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.हा स्मार्टफोन भविष्यात येईल की नाही याबाबत आताच सांगता येत नाही. पण यात वापरण्यात आलेली पारदर्शकतेची संकल्पना मात्र भन्नाट आहे.
पारदर्शक फोनचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याखाली युजर्सच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या स्मार्टफोनची बॅटरी आहे की नाही, ती पण पारदर्शक तर नाही ना? असा प्रश्न एका युजरने उपस्थित केला आहे. मोबाईलचं काय त्याचा वायरलेस चार्जर ही पारदर्शक आहे. हा स्मार्टफोन पाहताच त्याचं वेगळेपण सिद्ध होतं. परंतु, आगामी काळात या पारदर्शक स्मार्टफोनची संकल्पना खरी ठरू शकते. परंतु, अशा प्रकारचा फोन कधी लाँच होईल, याबद्दल आताच काही सांगता येत नाही. ट्विटरवर व्हिडिओत दाखवलेल्या पादर्शक फोनला अनेकजण खरं मानत आहेत. पण ती केवळ फोनची एक संकल्पना आहे.
पारदर्शक स्मार्टफोनचा हा व्हिडिओ भविष्यातील पादर्शक फोनच्या डिझाईनची संकल्पना यात दिली गेली आहे. या मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टिम एमआययूआय सारखी वाटत आहे. फोनप्रमाणे त्याचा चार्जरही वायरलेस असल्याचं दिसतं. अशा प्रकारचं फोनचं डिझाईन याआधी टिकटॉक व्हिडिओतही दाखवण्यात आलं आहे.
पहिल्यांदा मोबाईल आला तेव्हा तो गरज म्हणून वापरला जात होता. परंतु नंतर मात्र त्यात असंख्य फीचर जोडले गेले. बाजारात स्पर्धा करणाऱ्या अनेक कंपन्याही दाखल झाल्या. आता तर बोलण्यासह मोबाईल हे फोटो, व्हिडिओ तयार करणं व युजरच्या प्रकृतीचे अपडेट ठेवण्यासाठीही वापरले जात आहेत. भविष्यात यात आणखी बरीच फीचर्स येतील. पारदर्शक फोनही त्यातीलच एक प्रकार असू शकतो, असं मानलं जातं आहे.
A transparent smart phone design pic.twitter.com/9iXstC7jXN
— Vala Afshar (@ValaAfshar) August 5, 2022