चंद्राकांत बावनकुळे भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष ; मुंबईची जवाबदारी आशिष शेलार यांच्याकडे
मुंबई – सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्षपद रिक्त झालं होतं.त्यामुळे महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यपदी कोणाची नियुक्ती होणार याबाबतच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या.आज अखेर या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.आज दिल्लीतून भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षपदावर कोण असणार या नावाची घोषणा करण्यात आली आहे.भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याची अधिकृत घोषणा आज दुपारी करण्यात आली तर मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपच्या या नियुक्त्यांमुळे राज्यात फडणवीसांच्या गटाला धक्का बसला असून, पुन्हा एकदा नितीन गडकरी यांच्या समर्थकांना मोठ्या जबाबदारी देण्यात आल्याचे दिसून येत आहे.
प्रदेशध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बावनकुळे म्हणाले की, मी आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. महाराष्ट्राचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्यांचेही खऱ्या अर्थाने आज आभार मानतो, त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी दिली आणि या जबाबदारीतून मला पुढच्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात अजून नंबर एकचा पक्ष कसा करता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.