रोटरी नाईन हिल्स तर्फे आयर्नमॅन ट्रायथलॅान स्पर्धेतील विजेत्याचे सत्कार

नाशिक नगरी ही गुणी रत्नांची खाण -धनंजय बेळे

0

नाशिक,२८ ऑगस्ट २०२२ – नाशिकनगरी ही गुणी रत्नांची खाण असून त्यांचा सन्मान होणं ही नाशिककरांसाठी अभिमानास्पद बाब आहे.त्यामुळेच कझाकिस्तान येथे पार पडलेल्या ट्रायलथॉन स्पर्धेत आयर्नमॅन म्हणून निवड झालेल्या वीस जणांचा सत्कार करताना आम्हाला अत्यानंद होत आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ नाईन हिल्सचे नूतन अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले.

जागतिक क्रीडा दिनाचे औचित्य साधून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर कझाकिस्तान येथे पार पडलेल्या ट्रायलथॉन स्पर्धेत आयर्नमॅन म्हणून निवड झालेल्या वीस जणांचा सत्कार रोटरी क्लब ऑफ नाईन हिल्स तर्फे करण्यात आला त्यावेळी बेळे बोलत होते.या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ४ किमी स्विमिंग त्यानंतर १८० किलोमीटर सायकलिंग व त्यानंतर ४२ किलोमीटर रनिंग असे सर्व पूर्ण करायचे असते व याला १७ तासाचा मॅक्झिमम टाईम हा ठरलेला असतो.असे पूर्ण करणाऱ्या या २० जणांच्या टीममध्ये अतिशय लहान म्हणजे १७ वर्षाचा उत्कर्ष हा सर्वात तरुण आयर्नमॅन झालेला आहे तर ६७ वर्षाचे डॉ.सुभाष पवार हे सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून आयर्न मॅन झाले आहेत.अतिशय थरार पूर्ण असलेली ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणे आणि तेही वीस जणांनी हे महाराष्ट्रातले नाशिकचे पहिलेच उदाहरण आहे असेही बेळे पुढे म्हणाले. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर व रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल डॉ.आनंद झुंजूनवाला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा पार पडला.

Bhagwantrav Mithai Nashik

याप्रसंगी जीएसटीचे असिस्टंट कमिशनर विजय पगारे तसेच अनेक मान्यवर व क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज व रोटरी क्लब ऑफ नासिक नाईन हिल्सचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक हे अत्यंत संस्कृतिक व पौराणिक शहर आहे आणि येथे नवीन नवीन गोष्टी सातत्याने घडत असतात,कालानुरूप बदल होत असताना येथील 20 व्यक्ती आयर्नमन होणे ही नाशिकसाठी अभिमानास्पद बाब आहे आणि या व्यक्तींचा सन्मान धनंजय बेळे यांनी केला हा चांगला योग असल्याचे बी.जी.शेखर यांनी नमूद केले.आगामी काळात ही योजना ही संख्या 200 कशी होईल याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

डॉ.आनंद झुंजूनवाला यांनी आपल्या भाषणात पोलिओ निर्मूलनासाठी रोटरीने केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला.रोटरी ही सदैव गुणी खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.सत्काराला उत्तर देताना डॉ.सुभाष पवार व महेंद्र छोरीया यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.सेक्रेटरी वैभव चावक यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकल्प संयोजक रोटेरियन विजय जोशी,रोटेरियन अजय चव्हाण व रोटेरियन नरेंद्र शाळीग्राम यांनी विशेष मेहनत घेतली,माजी अध्यक्ष विराज गडकरी यांनी सूत्रसंचालन केले

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!