समर्थ बँकेला पूर्व वैभव प्राप्त करून देण्यासाठीच आपली उमेदवारी : सुहास माधवराव भणगे 

तोटा 'सेलिब्रेट' करणे कोणत्या सहकारात बसते ? 

0

नाशिक, ६ नोव्हेंबर २०२२ – श्री समर्थ सहकारी बॅंकेचा वाढलेला ‘एनपीए’ चिंताजनक आहे.आर्थिक वर्ष २०२१ – २०२२ मध्ये बँकेस झालेला एक कोटी ८४ लाखांचा तोटा, अॉडीट वर्ग ‘अ’ वरून ‘ब’ वर झालेली बँकेची घसरण, गेल्या तीन वर्षांपासून हक्काच्या  लाभांशापासून वंचित राहिलेला सभासद हे चित्र बदलण्यासाठी तसेच श्री समर्थ बँकेला पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण बँकेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलो असल्याचे प्रातिपादन उमेदवार सुहास माधवराव भणगे यांनी पत्रकार परिषदेत केले.

श्री समर्थ सहकारी बॅंक, नाशिक ची २०२२ – २०२७ साठी संचालक मंडळाची निवडणूक दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी होत आहे. यात सर्वसाधारण गटामधील १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असून सुहास भणगे यांनी आपल्या उमेदवारी मागील भूमिका विशद करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी बँकेच्या सद्य स्थितीबाबत भाष्य

suhas-madhavrao-bhange

केले. गेली अनेक वर्ष उमेदवार म्हणून अर्ज भरत होतो. परंतु नंतर जेष्ठांच्या विनंतीवरून माघार घेत असे. बँक ही मोजक्याच परंतु प्रामाणिक व्यक्तींच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित सुरू होती. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. मावळत्या संचालक मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करताना त्यांनी सभासदांसाठी आधार असलेली बँक सुरळीत व सुरक्षित रहावी , यासाठी उमेदवारी करत असल्याचे सुहास माधवराव भणगे यांनी नमूद केले.

आर्थिक वर्ष २०२१ – २०२२ मध्ये बँकेस एक कोटी ८४ लाखांचा तोटा झाला. खरेतर याबाबत गांभीर्याने विचार करणे आवश्यक होते. मात्र याउलट सर्वसाधारण सभेत पेढे वाटण्यात आले. तोटा ‘सेलिब्रेट’ करणे, कोणत्या सहकारात बसते असा प्रश्न सुहास माधवराव भणगे यांनी उपस्थित केला. मागील आर्थिक वर्षी बँकेचा ऑडिट वर्ग हा  ‘ अ ‘ वरुन ‘ ब ‘ असा खाली घसरला असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गेली ३ वर्ष सभासदांना त्याचा हक्काचा लाभांश सुध्दा देण्यात आला नाही. त्यामुळे सभासदांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवत होते. कोरोना काळात झालेल्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत मोजक्याच सभासदाच्या उपस्थितीत कोट्यवधी रुपयांची कर्जे खाती निर्लेखीत करण्यात आली .तर त्यापैकी रिकव्हरी मात्र फक्त काही लाखांत झाली, असेही सुहास माधवराव भणगे यांनी सांगितलं.

बँकेच्या आर्थिक गंभीर स्थितीबाबत अनेक वेळा संचालकांशी बोललो. बँकेस अनेक वेळा पत्र दिली व माझे आक्षेप नोंदवले. परंतू सथंगतीने होणारी रिकव्हरी व मोठी कर्जेखाती ‘एनपीए’ झाल्यामुळे बँकेस प्रचंड म्हणजेच एक कोटी ८४ लाखांचा तोटा झाल्याचा आरोप सुहास माधवराव भणगे यांनी केला. बँकेला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी जागरूक संचालक म्हणून आपण भूमिका निभावणार आहोत. यासाठी व सभासदांच्या आग्रहाखातर उमेदवारी केल्याचे सुहास माधवराव भणगे यांनी स्पष्ट केले.

सभासदांचा कष्टाने ठेवलेला पैसा सुरक्षित रहावा व सभासद व ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण आणि बँकेला पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी सभासदांनी आपल्या एक संधी द्यावी, अशी अपेक्षा सुहास माधवराव भणगे यांनी व्यक्त केली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.