महागाईने वाढवलं टेन्शन…पण शेअर बाजारात तेजी

विश्वनाथ बोदडे, नाशिक

0

विश्वनाथ बोदडे, नाशिक
भारतीय शेअर बाजार जरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटनांना डावलून उंची गाठत असला तरी संपूर्ण जगाला सध्या महागाईचे चटके सोसावे लागत आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर व्याजदर वाढवले जात आहेत याचाच अर्थ असा होतो की जनतेने आपला पैसा विविध मार्गांनी गुंतवणूक करावा व त्या माध्यमातून सरकारला कर रूपाने उत्पन्न मिळावे व बाजारामध्ये तरलता टिकून राहावी.तसे बघितले तर भारतामध्ये जगाच्या तुलनेत व्याजदर चांगले आहेत व महागाई दर सुद्धा यु एस, युके, युरोप या तुलनेत भारतात महागाई चे दर कमी आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरचे मूल्यांकन वाढत आहे परंतु त्याचबरोबर जपानची करन्सी जे पी वाय, युरो, येन, त्यांच्या किमती रुपयाच्या तुलनेत कमी झालेले आहेत.

भारतीय शेअर बाजार मध्ये स्थानिक वित्तीय संस्था विदेशी वित्तीय संस्था त्याचबरोबर रिटेल सहभाग वाढलेला आहे त्यामुळे बाजार विविध क्षेत्रांच्या सर्व भागांमध्ये खरेदी दिसून येत आहे आणि नवीन उचांक गाठण्याच्या तयारीत आहे.परंतु गुंतवणूकदारांनी नेहमीच आपला पोर्टफोलिओ बाजाराच्या दिशा व दशा बघून रीशेफल करणे गरजेचे असते त्यासाठी त्यांनी आपल्या अनुभवी व अभ्यासू गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सध्या कमोडिटी बाजारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तेजी-मंदी बघायला दिसत आहे मागील काही दिवसांपासून सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यामुळे त्याच्या किमती सुद्धा वाढलेले आहेत त्याचबरोबर मेटल कॉपर अल्युमिनियम यांच्या किमतीत वाढ झालेली आहे  क्रूड ऑइलच्या किमती काही प्रमाणात स्थिरावलेले आहेत.

भारताला डॉलरच्या माध्यमातून कच्चे तेल त्याचबरोबर विविध प्रकारच्या वस्तू आयात कराव्या लागतात त्यामुळे आपल्याला ते महागात पडत आहे त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसत आहे परंतु सरकारला जीएसटी च्या माध्यमातून दर महिन्याला दीड लाख करोडच्या आसपास सरकारच्या तिजोरीत जमा होत आहेत.

भारतीय शेअर बाजारांमध्ये रिटेल पार्टिसिपेशन वाढल्यामुळे शेअर बाजाराविषयी सेबी व विविध संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत अवेअरनेस पसरवला जात आहे त्यामुळे डिमॅट अकाउंट ची संख्या सुद्धा वाढत आहे त्याचा परिणाम लांबावडीसाठी बाजाराला सकारात्मक दिसत आहे त्याचबरोबर गुंतवणूकदारांनी प्रत्येक मंदी ही संधी समजावी आणि आपला पैसा टप्प्याटप्प्याने विविध क्षेत्रांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करून त्याचबरोबर नफा सुद्धा खिशात ठेवत चला.

बाजारातील तज्ञ सांगत आहेत की आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत त्याचे परिणाम भारतात सध्या दिसत नसले तरी भविष्यामध्ये जाणवू शकतात बाजार सकारात्मक स्वरूपात असला तरी आपल्या समभागांमध्ये नफा मिळत असेल तर तो घेत चालावा आणि बाजार खाली आला तर बाजारामध्ये सातत्यपूर्ण गुंतवणूक करत राहावे

पुढील आठवड्यासाठी माझा सकारात्मक स्वरूपात राहण्याची शक्यता असली तरी मिड आठवड्यामध्ये बाजारामध्ये नफा वसुली बघायला मिळू शकते गुंतवणूकदारांनी फार्मा एफएमसीजी टुरिझम हॉटेल्स हेल्थकेअर या क्षेत्राच्या समभागांमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे.

NIFTY १८११७ + ६४
SENSEX ६०९५० + ११४
BANK NIFTY ४१२५८ – ४०

निफ्टी वधारलेला शेअर्स 
ADANIENT ३८२६ + ६%
HINDALCO ४३० + ५%
BAJAFINSV १८०० + ४%
JSW STEEL ७०२ + ३%
ADANIPORTS ८५९ + ३%

निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव
HEROMOTOCO २५९८ – २%
DR.REDDY ४५२० – २%
CIPLA ११४६ – २%
HINDUNILVR २५२० – १%
DIVISLAB ३७४३ – १%

यु एस डी  आई एन आर $ ८२.५४५०
सोने १० ग्रॅम        ५०४५०.००
चांदी १ किलो        ५९४००.००
क्रूड ऑईल           ७४९०.००

_____________________________
मोबाईल – 88 88 280 555 

Vishwanatha Bodade
विश्वनाथ बोदडे, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.