शेअर बाजारात संमिश्र आठवडा

विश्वनाथ बोदडे ,नाशिक

0

विश्वनाथ बोदडे ,नाशिक
भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेअर बाजारामध्ये मागील आठवड्यामध्ये संमिश्र असे वातावरण बघायला मिळाले परंतु काही क्षेत्रांच्या समभागांमध्ये नफा वसुली दिसली तर पी एस यु बँकिंग क्षेत्रांच्या स्मॉल व मिडकॅप बँकिंग स्टॉक मध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी होती ,मागील आठवड्यामध्ये गुजरात व हिमाचल येथील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत.

भारतीय रिझर्व बँकेचे तिमाही धोरण जाहीर करण्यात आले व यामध्ये व्याजदरांमध्ये वाढ करण्यात आली त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या किमती डॉलर आणि रुपी यामध्ये स्थिरता सोन्या आणि चांदी मध्ये वाढलेली मागणी हे दर्शवत आहेत की भारतीय शेअर बाजार सध्या सर्वोच्च स्तरावर असल्याने काही प्रमाणात नफा वसुली बघण्यास मिळू शकते व गुंतवणूकदार सावध पाऊल म्हणून सोने आणि चांदीच्या गुंतवणुकीकडे वळू शकतात त्याचबरोबर सामान्य गुंतवणूकदारांमध्ये शेअर बाजाराप्रती वाढत असलेली आकर्षकता आणि दरमहा एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक वाढत आहे.

भारतीय शेअर बाजारांमध्ये सध्या वातावरण चांगले आहे, परंतु आतापर्यंतचा इतिहास सांगत आहे की, जेव्हा जेव्हा शेअर बाजार उंच स्तराला जातो आणि बाजारामध्ये स्मॉल कॅप आणि मिडकॅप मध्ये मागणी वाढते त्यावेळेस थोड्या प्रमाणात नफा वसुली बघायला मिळत असते, त्याचबरोबर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विदेशी वित्तीय संस्था या सुट्टीवर जात असल्या कारणामुळे बाजारामध्ये तेवढी हालचाल दिसत नाही ,यामुळे गुंतवणूकदारांनी जर आपली गुंतवणूक शॉर्ट टर्म साठी असेल तर नका वसुलीवर लक्ष केंद्रित करावे परंतु जे गुंतवणूकदार लांब अवधीसाठी गुंतवणूक करत आहेत त्यांनी बाजारामध्ये गुंतवणूक सातत्य ठेवायला हरकत नाही.

गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक डायवरसीफाय ठेवावी आणि प्रत्येक गुंतवणूक टप्प्याटप्प्याने करणे आवश्यक आहे त्याचबरोबर शेअर बाजार खाली आला तर ती संधी समजून गुंतवणूक सातत्यपूर्ण करत जावी

9th December-2022
NIFTY १८४९६ – ११३
SENSEX ६२१८१ – ३८९
BANK NIFTY ४३६३३ + ३६

निफ्टी वधारलेले शेअर्स
NESTLEIND २०२६० + २%
SUNPHARMA ९९३ + १%
ITC ३४२ + १%
DR.REDDY ४४०० + १%
TITAN २६०९ + १%

निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव
HCLTECH १०३० – ७%
TECHM १०३७ – ४%
INFY १५७० – ३%
WIPRO ३९४ – २%
TCS ३२९० – २%

यु एस डी आई एन आर $ ८२.३६५०
सोने १० ग्रॅम ५३८७०.००
चांदी १ किलो ६७२५२.००
क्रूड ऑईल ५९५०.००

मोबाईल -88 88 280 555

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.