भारतीय शेअर बाजार सर्वोच्च स्तरावर

विश्वनाथ बोदडे, नाशिक

0

विश्वनाथ बोदडे, नाशिक
मागच्या आठवड्यात बाजारामध्ये मंदी सदृश्य परिस्थिती होती परंतु ह्या सरत्या आठवड्यात बाजारामध्ये एक नवीन उभारी आली आणि बाजाराने नवीन उच्चांक गाठला याला मूलभूत कारणे ठरली ती आंतरराष्ट्रीय बाजारात वरील परिस्थिती त्याचबरोबर स्थानिक व वित्तीय संस्थांकडून होत असलेली मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रांच्या शेअर्समध्ये खरेदी त्याचबरोबर विविध कंपन्यांचे ती माही आलेले आकडे आणि पुढे असलेली गुजरात निवडणूक व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढत असलेले व्याजदर याला केंद्रबिंदू ठरवून बाजाराने हा सकारात्मक पवित्रा घेतलेला दिसत असला तरी भारतीय शेअर बाजारामध्ये हा नवीन शंख गाठण्यासाठी प्रामुख्याने सहभाग लागला तो बँकिंग आयटी फार्मा ऑटो रियालिटी या क्षेत्रामध्ये मागणी वाढलेली दिसली त्याला कारण ही तसेच आहे कारण भारतीय शेअर बाजारांमध्ये नोंदणीकृत असलेले सरकारच्या मान्य प्राप्त बँकांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात मागणी बघायला मिळत आहे

त्याचबरोबर मागील एक महिन्यांमध्ये देशभरामध्ये बांधकाम क्षेत्रात मधील खरेदी विक्रीला मोठ्या प्रमाणात जोर दिसला त्यामुळे सरकारच्या तिजोरीत सुद्धा चांगल्या प्रकारे कराच्या माध्यमातून निधी जमा झालेला आकड्यांच्या माध्यमातून दिसत आहे.

भारतीय शेअर बाजार जरी आंतरराष्ट्रीय बाजाराच्या चालीवर चालत असला तरी स्थानिक रिटेल गुंतवणूकदार त्याचबरोबर विविध क्षेत्रांच्या शेअर्समध्ये वाढत असलेली मागणी आणि देशांतर्गत होत असलेला विकास याला कारणीभूत दिसत आहे मागील काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे महागाईवर थोड्या प्रमाणात नियंत्रण आणण्यात यश मिळाले असते तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती मध्ये वत घट होत आहे याचा परिणाम आपल्याला भोगावा लागत असला तरी लांब होती साठी भारतीय अर्थव्यवस्था ही मजबूत राहणार असे संकेत तज्ञांच्या माध्यमातून मिळत आहे.

मागील आठवड्यामध्ये निफ्टीने १८६०४  हा नवीन उच्चांक गाठला तर बँक निफ्टीने ४३ हजार ७५ हा नवीन उच्चांक गाठला त्याचबरोबर सेन्सेक्स ने ६२२७२ एवढी पातळी गाठून आतापर्यंतचे उच्चांक मोडलेले आहे.

तज्ञांच्या मते आतापर्यंतचा इतिहास सांगतो की डिसेंबर मध्ये बाजाराने 80% साकारात्मकता दाखवून ग्रीन बंद झाले आहे व डिसेंबरच्या आठवड्यामध्ये जवळपास साडेतीन ते चार टक्क्याचा परतावा दिला आहे.

गुंतवणूकदारांना सल्ला

गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक विविध क्षेत्रांच्या समभागांमध्ये विभागून गुंतवणूक करावी त्याचबरोबर गुंतवणूक करताना स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारांचा अभ्यास करणे खूपच गरजेचे असते त्याचबरोबर पडत्या बाजारामध्ये गुंतवणूक नेहमीच फायद्याची असते त्यामुळे चढत्या बाजारात आपल्या शेअर्समध्ये जर चांगला नफा मिळत असेल तर तो जमा करून पडत्या बाजारामध्ये विविध क्षेत्रांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करत राहावे परंतु हे सातत्य राहणे गरजेचे असते.

बऱ्याच गुंतवणूकदारांना असे वाटते की मी शेअर बाजारामध्ये जर गुंतवणूक केली तर मला मोठ्या प्रमाणात कर भरावा लागत असेल अशा गुंतवणूकदारांना माझा सल्ला आहे की सरकारच्या नियमाप्रमाणे जर तुम्ही शेअर बाजारात नफा कमवला तर एक वर्षाच्या आत मध्ये केलेल्या ट्रांजेक्शन वर पंधरा टक्के व जर आपण एप्रिलमध्ये शेअर घेतला असेल आणि तो दुसऱ्या वर्षाच्या मे मध्ये विकला असेल तर आपल्याला लॉन्ग टर्म म्हणून पंधरा टक्के टॅक्स लागेल यामध्ये सुद्धा जर आपण एक लाख एवढा नफा कमवला असेल तर आपल्याला कोणताही कर भरावा लागणार नाही.

त्याचबरोबर जर आपण ३० टक्के ह्या ब्रॅकेटमध्ये असाल तरीसुद्धा तुम्हाला वर नमूद केलेल्या प्रमाणे कर भरावा लागेल काही लोकांच्या मनामध्ये असते की मी ३० टक्के ब्रॅकेट मध्ये आहे म्हणून मला ३० टक्केच कर भरावा लागेल तर तसे नाही तर वरील नमूद केलेल्या प्रमाणे आपण त्या नियमाचे पालन करावे.

शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असताना काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण कायदेशीर रित्या म्हणजेच सेवेने नोंदणी केलेले ब्रोकर्स ब्रोकर सब ब्रोकर्स यांच्या मार्फत ट्रेड करावे आपले स्वतःचे डिमॅट अकाउंट ओपन करून त्यामध्येच आपल्या बँकांच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करून शेअरची खरेदी विक्री आपण करू शकतात तसेच आपण डिमॅट च्या माध्यमातून म्युचल फंड स्टॉक्स सोने-चांदी खरेदी विक्री करू शकतात.

NIFTY १८५१२ + २८
SENSEX ६२२९३ + २०
BANK NIFTY ४२९८३ – ९१

निफ्टी वधारलेला शेअर्स 
HDFCLIFE ५८८ + ३%
TATA MOTORS ४३४ + 3%
HEROMOTOCO २७११ + २%
COALINDIA २३२ + १%
RELIANCE  २६१३ + १%

निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव
ICICI BANK ९३० – १%
NESTLEIND १९५५५ – १
KOTAK BANK १९२९ – १%
TITAN २५९१ – १%
BRITANNIA ४१६५ – १%

यु एस डी  आई एन आर $ ८१.७३२५
सोने १० ग्रॅम       ५२५४०.००
चांदी १ किलो       ६१७४५.००
क्रूड ऑईल         ६३०४.००

संपर्क – 88 88 280 555 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.