नाशिक,२७ नोव्हेंबर २०२२ – त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आधारतीर्थ आश्रमात चार वर्षाच्या बालकाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील द किंग फाउंडेशन संचलित आधाराश्रमात आदिवासी अल्पवयीन मुलीवर तेथील संचालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर नाशिकसह संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनेची व्याप्ती वाढली असून यात प्रचंड भयावह चित्र समोर आले आहे.
द किंग फाउंडेशन संचलित आश्रमातील आणखी ५ मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. संशयित आरोपी आश्रमाचा संस्थाचालक संशयित हर्षल बाळकृष्ण मोरे (वय ३२ रा. मानेनगर, म्हसरुळ) यानेच हे बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. घटना अतिशय गंभीर असून घटनेने नाशिक हादरलं आहे.मोर यास पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यास बुधवारपर्यंत (दि. ३०) पोलिस कोठडी सुनावली आहे.
आधार आश्रमातील हे भयावह चित्र समोर आल्याने आता राज्यात एकच खळबळ उडली आहे. गुरुवारी (दि. २४) ला नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील मानेनगर येथील ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले होते. मुलीच्या फिर्यादीत म्हंटले होते की, संचालक हर्षल मोरे याने हातपाय दाबून देण्याचा बहाणा करत पिडीतेला खोलीत बोलावले आणि अश्लील व्हिडीओ दाखवत तिच्या सोबत असे कृत्य केले, त्यानंतर याची वाच्यता कुठे केल्यास तुला वसतिगृहातून काढून टाकेल अशी धमकीही पिडीतेला दिली होती .
पिडीतेने याप्रकरणी म्हसरुळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून संशयताला अटक करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात पोक्सो आणि अँट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत मुलीसारखेच इतर मुलींसोबत देखील अशा गैर प्रकार झाल्याचा आरोप या पिडीत मुलीने केला होता. त्यानंतर पोलिसांनी इतर मुलींना विश्वासात घेत त्यांच्यावर झालेल्या अन्यायला वाचा फोडली. यात स्पष्ट झाले की संचालकाने आधाराश्रमात आणखी ५ मुलींवर अत्याचार केले होते. या आश्रमात एकूण १३ मुली होते वास्तव्यास होत्या.तर १५ मुले होत मात्र हि मुले दुसऱ्या बाजूला राहत होते.आधाराश्रमात शिक्षणासाठी आलेल्या या मुलींच्या परिस्थितीचा फायदा घेत मुलीनवर लैंगिक अत्याचार केले. घटनेची वाच्यता कुठे कराल तर वसतिगृहातून काढून टाकण्यात येईल अशी धमकी संचालक या मुलींना द्यायचा.
घटनेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाशिकमधील कथित आधारश्रम येथील अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून बलात्कार केल्याच्या मुद्द्यावरून सुरक्षेच्या मुद्द्याला हात घातला आहे. चित्रा वाघ यांनी राज्यातील सर्व आधारश्रमांचे ऑडिट होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. आधारश्रमाच्या परवानगी वरुन नेहमी प्रश्न उपस्थित केले जात असतांना चित्रा वाघ यांची मागणी महत्वाची मानली जात आहे.