शेअर बाजाराने गाठला नवीन उच्चांक

विश्वनाथ बोदडे नाशिक

0

विश्वनाथ बोदडे नाशिक
मागील आठवड्यामध्ये शेअर बाजाराने आतापर्यंतचा नवीन उच्चांक गाठला यामध्ये प्रामुख्याने निफ्टी आणि सेन्सेक्स यामध्ये समाविष्ट असलेल्या समभागांचा मोठा सहभाग दिसला त्याचबरोबर स्मॉल कॅप मिडकॅप या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी होती जागतिक स्तरावर काही प्रमाणात चढउतार दिसला असला तरी भारतीय शेअर बाजारामध्ये मागील आठवड्याचा एक दिवस सोडला तर संपूर्ण संपूर्ण दिवस सकारात्मक राहिला मागील आठवड्यामध्ये निफ्टीने १८३ अंकांनी तर सेन्सेक्स ५७४ अंकांनी आणि बँक निफ्टी ७३ अंकांनी सकारात्मक राहिले बँकिंग सेक्टरमध्ये चांगल्या प्रकारे मागणी दिसली परंतु ही सकारात्मक टिकवण्यासाठी आयटी ह्या क्षेत्राचा मोठा सहभाग होता त्याला कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढते व्याजदर आणि देशांतर्गत जीएसटी आणि इतर माध्यमातून भारत सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होत असलेला पैसा यामुळे स्थानिक वित्तीय संस्था आणि विदेशी वित्तीय संस्था भारतीय शेअर बाजारांकडे आकर्षित होत असताना दिसत आहे .

त्याचबरोबर रिटेल पार्टिशन मोठ्या प्रमाणात वाढत असले तरी वाढत्या स्तरावर गुंतवणूकदार नफा वसुली करण्याच्या प्रयत्न असतात त्यामुळे पुढील आठवड्याची दिशा व दशा आंतरराष्ट्रीय स्तरावर अवलंबून असते तरी भारतामध्ये गुजरात इलेक्शन हा केंद्रबिंदू ठरू शकतो.

त्यामुळे भारतीय शेअर बाजार सुद्धा त्यावर रिएक्शन येऊ शकते सामान्य गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक बाय ऑन डीप असे ठेवावी.
असे तज्ज्ञ सांगत आहेत.

सध्या डॉलरच्या किमती घसरत आहेत कृपया मजबूत होत आहे त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या किमती घसरत आहे त्यामुळे देशांतर्गत पेट्रोलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे महागाईवर नियंत्रण करण्यास सरकार यशस्वी ठरली तर आपण जीडीपी त्याचबरोबर अर्थव्यवस्थेवर पडत असलेला भार याचे समतोल साधण्यात जर सरकार यशस्वी ठरली तर भारतीय शेअर बाजारांमध्ये अजून उत्साह निर्माण होईल परंतु बाजाराचे जाणकार सांगत आहेत की जागतिक स्तरावरील स्थिती आपल्या बाजारावर जरी इफेक्ट करीत नसली तरी त्याचा शॉट मध्ये येऊ शकतो त्यामुळे बाजारामध्ये नफा वसुलीची शक्यता वर्तवली जात आहे जर अशी नफा वसुली आली तर गुंतवणूकदारांनी आपला पोर्टफोलिओ विविध क्षेत्रांच्या समभागांमध्ये ठेवावा .

भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक विविध क्षेत्रांमध्ये करून चांगल्या सल्लागाराचा सल्ला घेऊनच करावी त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेकडे जगातील अर्थशास्त्रांचा बघण्याचा दृष्टिकोन आता बदलला असल्यामुळे भारतीय शेअर बाजारांमध्ये अजून नवीन उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे परंतु नफा वसुली निश्चित येईल असे बाजाराचे जाणकार सांगत आहेत त्यामुळे आपल्या अबिलिटी नुसार विविध क्षेत्रांमध्ये आपली गुंतवणूक सातत्यपूर्ण सुरू ठेवावी असे सुद्धा बाजाराचे जाणकार सांगत आहेत.

NIFTY १८६९६ – ११६
SENSEX ६२८६८ – ४१५
BANK NIFTY ४३१०३ – १५७

निफ्टी वधारलेले शेअर्स
APOLLOHOSP ४८६५ + २%
TECHM १११४ + १%
DR.REDDY ४५२१ + १%
TATASTEEL ११२ + १%
GRASIM १८१७ + १%

निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव
EICHARMOT ३३३१ – ३%
TATACONSUM ७९५ – २%
M&M १२६७ – २%
HEROMOTOCO २८१६ – २%
HINDUNILVR २६२० – २%

यु एस डी आई एन आर $ ८१.४३२५
सोने १० ग्रॅम ५३८९०.००
चांदी १ किलो ६५७००.००
क्रूड ऑईल ६६७३.००

संपर्कासाठी मोबाईल नंबर – 88 88 280 555

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.