नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तपदी डॉ.प्रवीण गेडाम यांची नियुक्ती

1

नाशिक,दि,३१ मे २०२४ –नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तपदी डॉ.प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे हे आज दि. ३१ मे रोजी निवृत्त झाले असल्याने त्यांच्या जागेवर डॉ.प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे,

कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून गेडाम यांची ख्याती आहे.नाशिकमध्ये मनपा आयुक्त म्हणून गेडाम यांनी २०१४ ते २०१६ या कालावधीत महापालिकेची धुरा सांभाळली होती.अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी याबाबत आदेश काढला असून, डॉ.प्रवीण गेडाम यांनी तातडीने पदभार स्वीकारावा,असे म्हटले आहे.डॉ.प्रवीण गेडाम यांनी देखील महापालिका व अन्य खात्यांतर्गत नाशिकमध्ये काम केलेले अधिकारी आहेत.

लवकरच लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपत आहे.त्यामुळे ठप्प झालेली विकास कामे,विविध अनुदाने व वितरण,पाऊस लवकर न पडल्यास दुष्काळग्रस्तांना मदत आदी प्रश्न त्यांना प्राधान्याने हाताळावे लागणार आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. राजेंद्र कुलकर्णी says

    The Man with MISSION AND PASSION returned. Welcome to Nashik Sir…

कॉपी करू नका.