नाशिक – कोविड महामारीच्या दोन्ही लाटेत अनेक लोक बाधित होऊन कोरोनाला बळी पडले. कोरोनाने प्रत्येकाच्या जवळच्या, नात्यातल्या किंवा ओळखीच्या व्यक्तीचा बळी घेतलेला आहे. कोविडने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. त्यामध्ये स्वतःचे आरोग्य जपणे आणि जीव वाचवणे हे सर्वात महत्वाचे आहे. संकाटातून सुखरूप बाहेर आल्यानंतर त्यातून काहीतरी बोध घेणे आवश्यक आहे, तरच त्या संकटातून सुखरूप बाहेर आल्याचे महत्व समजेल,असे प्रतिपादन नाशिकचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. संजय धुर्जड यांनी सांगितले.
लासलगाव खरेदी-विक्री संघाचे मा. व्हा. चेअरमन, लोकनेते दत्ताजी पाटील सह. बँकेचे संचालक व वनसगांव येथील प्रगतीशील शेतकरी कै. रत्नाकर आप्पा डुंबरे पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त आयोजित श्रध्दांजलीपर कार्यक्रमात डॉ. धुर्जड बोलत होते. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक, भावनिक तसेच अध्यात्मिक समतोल असणे गरजेचे आहे. शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्याचे अनेक उपाय समजून सांगत, भावनांवर आवर घालणे, नातेसंबंध सुधरवणे, सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन ठेवणे, घरात धार्मिक आणि सात्विक वातावरण निर्माण करणे, अशा अनेक विषयांवर डॉ. धुर्जड यांनी आपले मत व्यक्त करून उपस्थितांना त्याचे महत्व पटवून सांगितले.
धार्मिक विधी असलेल्या अशा कार्यक्रमांमध्ये सामाजिक बांधिलकी तसेच जनजागृतीच्या उद्देशाने एखाद्या ह.भ.प. महाराजांचे कीर्तन किव्हा प्रवचन आयोजित केले जाते. परंतु, या कार्यक्रमाचे आयोजन एक अनोख्या आणि वैशिष्ठ्यपूर्ण पद्धतीने केले गेले. धार्मिक, सामाजिक आणि राजकीय वारसा असलेल्या डुंबरे कुटुंबीयांनी सामाजिक हित आणि सद्य परिस्थिती लक्षात घेऊन जनतेला आरोग्य तसेच जीवाचे महत्व समजून सांगण्यासाठी एका डॉक्टरचे आरोग्यविषयक व्याख्यान आयोजित केले, अशी माहिती दिवंगत रत्नाकर आप्पा डुंबरे यांचे ज्येष्ठ पुत्र श्री. धनंजय डुंबरे यांनी दिली.नुकताच हा कार्यक्रम उगाव येथील पांडुरंग लॉन्स मध्ये आयोजीत करण्यात आला होता.
लासलगाव येथील डॉ. सुजित गुंजाळ व डॉ. विलास कांगणे यांची संकल्पना डुंबरे परिवाराने मान्य करत, अशा अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भविष्यात अशा प्रसंगी सामाजिक जाणिवेतून जनजागृती करण्याचा एक नवीन पायंडा पडेल, असे मत डॉ. गुंजाळ आणि डॉ. कांगणे यांनी व्यक्त केले.
यावेळी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्री. जयदत्त होळकर, मा. आ. श्रीमती मंदाकिनी ताई कदम, शिवसेना युवानेते श्री. कुणाल दराडे, लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सौ. सुवर्णा ताई जगताप, प्रा. अशोक क्षीरसागर सर, यांनी कै. रत्नाकर आप्पांना श्रद्धांजली अर्पण केली. निफाड तालुका तसेच जिल्ह्यातील अनेक मान्यवर, वनसगांव, उगाव शिवडी येथील ग्रामस्थ, डुंबरे परिवार, त्यांचे नातेवाईक तसेच मित्रपरिवार त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यास उपस्थित होते. समाजातील सर्वच स्तरातून या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले व भविष्यात असे बदल होणे आवश्यक आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले.
वरील बातमी वाचली आनंद झाला परंतु त्यासोबत दुःख देखील होत आहे जी व्यक्ती लिहीत आहे ती जर एवढी हुशार असेल तर व्यवसाय करताना मित्रांच्या माध्यमातून फसवणूक करताना थोडी शरम वाटत नाही का आणि वर्तमानपत्राने देखील याची दखल घ्यावी वाचकांनी देखील दखल घ्यावी सदरचा व्यक्ती व्यवसायाशी किती एकनिष्ठ आहे आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची मित्रांची किती कोटी वर फसवणूक केलेली आहे तो आकडा अजून बाहेर येणे बाकी आहे दैनिक गावकरी अत्यंत विश्वास पात्र दैनिक आहे त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे की अनेक ठिकाणी आरोपी असलेले डॉक्टर संजय दुर्धड यांचे पाय किती खोलात आहे