मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज येथे जाऊन भेट घेतली.या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली. हि केवळ सदिच्छा भेट होती.या भेटीत आमची राजकीय चर्चा जरी झाली असली. तरी मनसे-भाजपच्या युतीचा या भेटीत प्रस्ताव देण्यात आलेला नाही. तसेच युतीवर चर्चाही झाली नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी माध्यमा समोर बोलतांना स्पष्ट केलं.
या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, राज ठाकरे, यांची आणि माझी नाशिकला अचानक भेट झाली. आम्ही दोघेही नाशिक दौऱ्यावर होतो. त्यांनी मुंबईत घरी येण्याचं निमंत्रण दिलं. चहा प्यायला बोलावलं होतं. त्यामुळे मी त्यांना आज भेटलो.
या भेटीत राजकीय चर्चा झाली. पण भाजप आणि मनसे युतीचा कोणताही प्रस्ताव या बैठकीतआला नाही. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांचे विचार सांगणं हा या बैठकीचा विषय होता, असं पाटील यांनी सांगितलं.प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ यावी लागते. नाशिकला राज ठाकरे नेहमी जातात मी ही जातो.त्यादिवशी आम्ही अचानक भेटलो. नाशिकमध्ये समोरासमोर भेटलो, आज चर्चा झाली.असे हि चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची आज सदिच्छा भेट जरी असली तरी आजच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.भविष्यात भाजपा व मनेस यांची युती होणार का? हा देखील प्रश्न अनेकांच्या मनात सध्या निर्माण झालेला आहे. तर, मागील २० दिवसांत या दोन्ही नेत्यांची ही दुसरी भेट असल्याने, भाजपा – मनसे युतीच्या चर्चा अधिकच रंगल्या आहेत.