ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज वर्ज्य दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – आर्द्रा (सकाळी ६.३७ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- संपन्न दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. आर्थिक उलाढाल वाढेल.
वृषभ:- कला प्रांतात चमक दाखवाल. वक्तृत्व कामास येईल. शब्द पाळावा लागेल.
मिथुन:- आत्मविश्वास वाढेल. मेजवानीचे योग आहेत. छोटी सहल घडेल.
कर्क:- फारसा अनुकूल दिवस नाही. हुरहूर वाढेल. अनामिक संकटे सामोरे येतील.
सिंह:- दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल आहे,. या काळात कामे पूर्ण करा. मन प्रसन्न राहील.
कन्या:- कामाच्या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. उपासना करा.
तुळ:- शेअर्स सारख्या गुंतवणुकीतून लाभ होतील. छोटे प्रवास घडतील. काळजी घ्या.
वृश्चिक:- पूर्वार्ध जरा चिंतेत टाकणारा आहे. दगदग वाढेल विश्रांती घ्या.
धनु:- विवाह इच्छुकांना शुंभ समाचार समजतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. सहकारी मनापासून साथ देतील.
मकर:- आर्थिक आवक चांगली राहील. येणी वसूल होतील. तब्येत सांभाळा.
कुंभ:- कुटुंबास वेळ द्या. अपत्यांना समजून घ्या. धाडसी निर्णय घ्याल.
मीन:- नवीन कामे मिळतील. उत्साह वाढीला. मौल्यवान खरेदी होईल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)