नाशिक पोलीस आयुक्तपदी अंकुश शिंदे यांची नियुक्ती

विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी शेखर यांचीही बदली

0

नाशिक,१३ डिसेंबर २०२२ – नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली असून आता नाशिकचे नूतन पोलीस आयुक्त ( Nashik Police Commissioner) म्हणून अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी शेखर यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागी विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्यातील एकूण ३० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून यात नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची देखील बदली झाली आहे.

राज्य शासनाने आज मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले.अंकुश शिंदे हे पिंपरी चिंचवडचे आयुक्त होते.आता शिंदे यांच्याकडे नाशिकची जवाबदारी देण्यात आली आहे. जयंत नाईकनवरे यांनी काही महिन्यापूर्वीच नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली होती.मात्र आता त्यांची बदली करण्यात आली आहे.

उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरती नुकतेच पिंपरी चिंचवडमध्ये आंबेडकर प्रेमींकडून शाहीफेक करण्यात आले होती. यामुळे राज्यात रणकंदन झाले होते. या शाईफेक प्रकरणी १ पोलीस निरीक्षक २ दोन उपनिरीक्षक आणि ७ कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तडकाफडकी निलंबीत केले होते. पोलीस निरीक्षक सतीश नांदूरकर आणि पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, गणेश माने यांच्यासहीत ७ पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी निलंबीत केले होते. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निलंबन मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात एकूण 30 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून यात नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची देखील बदली झाली आहे. त्यांच्या जागी धडाडीचे निर्णय घेणारे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!