आजचे राशिभविष्य  सोमवार, २३ जानेवारी २०२३  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ शुक्ल द्वितीया. शिशिर ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज अनिष्ट दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – धनिष्ठा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:- जुनी येणी वसूल होतील. कठोर निर्णय घ्याल. आर्थिक आवक चांगली राहील. उत्तरार्ध अनुकूल आहे.
वृषभ:- सौख्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी सन्मान होईल. सकाळी कामे पूर्ण करा.
मिथुन:- वादविवाद टाळा. मित्रांशी मतभेद नकोत. शत्रूचा त्रास जाणवेल. उत्तरार्ध चांगला आहे.
कर्क:- सकाळी कामे पूर्ण करा. दगदग वाढेल. वाहने जपून चालवा. ध्यानधारणा करा.
सिंह:- व्यवसायात दबदबा राहील यश मिळेल. विरोधक नामोहरम होतील. आर्थिक प्राप्ती होईल.
कन्या:- संमिश्र दिवस आहे. दिवसाची सुरुवात काहीशी संथ होईल. नंतर कामाचा वेग वाढेल.
तुळ:-  घरात शांतता ठेवा. शेजाऱ्यांशी वादविवाद होऊ शकतात. ध्यानधारणा लाभदायक ठरेल.
वृश्चिक:– पूर्वार्ध सुखाचा आहे. कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील.
धनु:-  एकाच वेळी आनंद आणि तणाव यांचा अनुभव येईल. मोजके बोला. जामीन राहू नका.
मकर:- शत्रू शिरजोर होतील. मत्सर त्रास जाणवेल. संपत्तीचे प्रदर्शन टाळा.
कुंभ:- सुरुवात संथ आहे. कठोर बोलणे टाळा. संयम आवश्यक आहे. संध्याकाळ आनंदाची.
मीन:- पूर्वार्ध चांगला आहे.कामे मार्गी लागतील. वेळ दवडू नका. संध्याकाळ खर्चात टाकणारी असेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!