आजचे राशिभविष्य सोमवार, २० फेब्रुवारी २०२३  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ अमावस्या. शिशिर ऋतू.
राहूकाळ- सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र :’धनिष्ठा’
आज अनिष्ट दिवस आहे. सोमवती अमावस्या. (तिथी दुपारी १२.३६ पर्यंत)
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:- अनुकूल दिवस आहे. येणी वसूल होतील. उत्तम आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील.
वृषभ:– कामाच्या ठिकाणी अपमान होऊ शकतो. जबाबदारी वाढेल. विरोधक नामोहरम होतील.
मिथुन:- हिट शत्रूंच्या कारवाया वाढतील. अंगावर घेतलेले काम चांगल्या पद्धतीने पार पडाल. शिक्षणात प्रगती होईल.
कर्क:- उदास वाटेल. वाहने जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या. मन शांत ठेवा. ध्यानधारणा करा.
सिंह:- जोडीदारासाठी खर्च कराल. भागीदारीत यश मिळेल. सरकारी कामे पुढे सरकतील. नेतृत्वगुण सिद्ध होईल.
कन्या:- अधिकाराचा योग्य वापर कराल. आर्थिक प्राप्तीसाठी उत्तम दिवस आहे. मात्र मोठे करार आज नकोत.
तुळ:- कामात अडथळे येतील. वादविवाद टाळा. मन शांत ठेवा. स्पर्धेत मात्र यश मिळेल. प्रवासाचे बेत पुढे ढकलले जातील.
वृश्चिक:- शेतीची कामे पुढे योग्य वेळेत होतील. जमीन व्यवहारात यश मिळेल. मातेकडून लाभ होतील.
धनु:- संमिश्र दिवस आहे. धनलाभ होणार आहे. आरोग्य चांगले राहील. मनासारखी बढती/बदली होईल.
मकर:- खर्चात वाढ होणार आहे. मात्र त्याची भरपाई देखील होईल. पराक्रम गाजवाल.
कुंभ:- मेजवानी मिळेल. ओळखीतून लाभ होतील. घरात बदल कराल. गुप्त शत्रूपासून सावध रहा.
मीन:- खर्चात वाढ होणार आहे.  संयम बाळगा. क्रोध आवरा. अधिकाराचा दुरुपयोग होऊ देऊ नका. संशयाचे वातावरण नको.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!