सदृढ आरोग्यासाठी सेंद्रीय भाजीपाला उपयुक्त

हरिभाऊ सोनवणे , सेंद्रीय, विषमुक्त शेती काळाची गरज  भाग -२

0

आज प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे.त्यात कृषी क्षेत्र अपवाद  कसे राहणार.भारत कृषी प्रधान देश आहे. आजही अनेकांचाउदरिर्वाहासाठीशेतीहाचपर्याय आहे.शेतातील पीक लवरच येण्यासाठी, तननाशक,विविध रोग जाण्यासाठी भाजीपाला तसेच धान्यावर रासायनिक खते व कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे शारिरीक व्याधी जडत आहेत.

या स्पर्धेमुळे कॅन्सरसारखे आजारही बळावत आहेत. शेतकऱ्यांनी सेंद्रीय पद्धतीने विषमुक्त फळे, भाजीपाल्याची लागवड केल्यास अधीक दरही मिळेल तसेच नागरीकांनाही आरोग्यासाठी उपयुक्त असलेला विषमुक्त भाजीपाला मिळेल. परंतु त्यासाठी काही दिवस धीर धरावा लागणार आहे. झटपट पिक येण्यासाठी विविध औषधांची फवारणी केलेला भाजीपाला बाजारात आणला जातो. त्याच्या सेवनामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. नैसर्गिकरित्या भाजीपाला अथवा फले पिकवले व शेंद्रिय, जैविक भाजीपाला उत्पादन केले तर  सुरवातीला कमी उत्पादन मिळते. त्यामुळे खरेदीदाराने थोडं महाग का असेना पण तो नैसर्गिक पद्धतीने पिकवला असल्याने आरोग्यास कुठला ही धोका निर्माण होत नाही. यासाठी तो खरेदी करायला हवा. यासाठी शेतकरी बंधूंना काही दिवस धीर धरावा लागतो.यातून रासायनिक पेक्षा पैसा निश्चितच अधिक मिळणार आहे,

बिजमाता राहीबाइ पोपारे यांनी देशी बीजाचे मोठे काम उभे केले आहे.जे काम शात्रज्ञांना जमलं नाही, त्यांनी केलं . जुने देशी वान शोधून त्याचे उत्पन्न घेणे काळाची गरज आहे.

नवीन शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत हार न मानता नैसर्गिक, जैविक शेती करून विषमुक्त उत्पादन घ्यायला हवे. मेथी, कोथींबीर, कारले, वांगी, गवार, टोमॅटो, मुळा, फुलकोबी, पानकोबी यासह मोसंबी, सदबाहर पेरु, भोपळा, आंबा अशी पीक सेंद्रीय पद्धतीने घेतल्यास उत्पन्न चांगले येते. व्यापारी तुमची शेती शोधत आल्याशिवाय राहणार नाही.या पृथी तलावावर परमेश्वरा नंतर कोणाला स्थान असेल तर ते जगाचा पोशिंदा म्हणून ज्याची ओळख आहे तो शेतकरी राजाचं देव आहे.हे संत मुनी सांगतात.मग आपण जगाला विषमुक्त खायला का द्यायचे नाही. भले शासनाचे आपल्याकडे दुर्लक्ष आहे परंतु आपण विषमुक्तच खायला देऊ असा संकलप करायला काय हरकत आहे. (क्रमशः)

सेंद्रीय शेती काळाची गरज – सिद्धार्थ केदारे 

धार्मिक, राजकीय, सामजिक, ऐतिासिकदृष्ट्या तसेच विविध चळवळी साठी नाशिक जिल्हा नेहमीच आग्रभागी राहिला आहे.शेती उद्योगात नवनवीन क्रांती झाली. जिल्ह्यातील शेतकरी नेहमी प्रयोगशील राहिला.मात्र या प्रयोगात शेतकरी नेमका पेस्टी साईड आणि जैविक च्या नावाखाली व्यवसायात करण्याऱ्या काही धंदेवाईकांमध्ये अडकला असल्याचे चित्र आहे. सेंद्रीय व शाश्वत उत्पन्न देणाऱ्या शेतीत ,गेल्या १४ वर्षा पासून अहोरात्र मेहनत करून खडकाला पाझर फोडणारा ध्येय वेडा तरुण ,कृषी दुत खडक ओझर येथील सिद्धार्थ केदारे अवलिया ठरला आहे.

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना बारावी पर्यंत शिक्षण घेऊन सिद्धार्थ केदारे नामक युवकाने शाश्वत सेंद्रीय शेती करण्याचा निर्धार केला आणि आपल्या जवळ असलेल्या साडेबारा एकर खडकाळ शेतीत अक्षशः  फळाचे नंदनवन फुलवून पृथ्वीवर स्वर्ग फुलवला.त्यांच्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गेल्या १४ वर्षा पासून या ध्येयवेड्या तरुणाने आपल्या शेतात नेहमी प्रयोगशील राहून सदाबहार पेरू,फणस, अँपल बोर, चिंच, सफेद, निळ,काळ,लाल जांभूळ, आवाकोडा, ड्रॅगन, वॉटर आप्पाल, मोहगणी,नारळ अशा विविध  फळ झाडांच्या प्रजाती विकसित केल्या.या प्रयोगात या वेड्या युवकाला  किती कष्ट, यातना सहन कराव्या लागल्या असतील याचा विचार फक्त हाडाचा शेतकरीच करू शकेल.अशा या तरुणाचे काम, डॉक्टर, शाश्रज्ञ,अभियंता या पेक्षा निश्चित कमी ठरणार नाही

सध्यस्थितीत अस्मानी आणि सुलतानी संकटांशी सामना करत शेतकऱ्यांना मोठ्या कष्टाने शेती करावी लागत आहे. बेभरवशाची शेती करण्या पेक्षा शाश्वत, विषमुक्त शेती करून घामाचे चार पैसे पदरात पाडून घ्या, असाच सल्ला आज खडकओझर येथे शेतकऱ्यांना मिळत आहे. हतबल परिस्थितीत हा सल्ला उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही. आज शेकडो शेतकरी त्यांची शेती पाहण्यासाठी गर्दी करत आहे,आणि आपल्या शेतात सदाबहार पेरू,फणस,आंबा,जांभूळ,काजू आपल्या शेतात लागवड करत आहे.

हरिभाऊ सोनवणे
(पत्रकार तथा प्रयोगशील शेतकरी-९४२२७६९४९१)

Haribhau Sonavane Nashik
हरिभाऊ सोनवणे (पत्रकार तथा प्रयोगशील शेतकरी-९४२२७६९४९१)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.