भारतीय यंत्रणा कोणत्याही आजाराला तोंड देण्यासाठी सक्षम  : डॉ. रमण गंगाखेडकर

वसंत व्याख्यानमालेतून उलगडला कोविड विरूद्ध लढ्याचा प्रवास.

0

नाशिक, दि. ७ मे २०२३ – युरोप, अमेरिकेसह संपूर्ण जगाचा थरकाप उडविणा-या कोवीडचा प्रसार चीनमधून झाला. परंतु त्याकाळात आपल्याकडे त्याला तोंड देण्यासाठी कोणतीही उपचार पद्धती किंवा लस उपलब्ध नव्हती. मात्र प्रतिकुल परिस्थितीतही सक्षम नेतृत्वाच्या आधारे भारतीय यंत्रणांनी हातात हातात हात घालून हे आव्हान यशस्वीरित्या परतावून लावले. त्यामुळे आत्मविश्‍वास उंचावलेली भारतीय यंत्रणा कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम असल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी आज केले.

यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे  सातवे पुष्प डॉ. गंगाखेडकर यांनी गुंफताना प्रतिकुल परिस्थितीतील कोरोना विरोधातील लढा, नेतृत्वाबरोबरच आरोग्य यंत्रणांची खंबीर साथीमुळे दिलेला यशस्वी लढा यावर भाष्य करत उपस्थितांत आशावाद जागविला.

स्वर्गीय ॲड. उत्तमराव ढिकले स्मृती व्याख्यानमालेत ‘भारताचा कोविड विरोधातील लढा’ तत्कालिन परिस्थिती यावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना आज भारत कोणत्याही परिस्थितीला सक्षमपणे तोंड देऊ शकतो, याबाबत विश्‍वास जागविला.

व्याख्यानापूर्वी मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित होरायझन इंग्लिश मिडियम स्कुलच्या विद्यार्थीनींनी ‘कानडा राजा पंढरीचा’ या गाण्यावर नृत्य सादर केले. मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचलनातून मालेचा प्रवास विषद करत उपस्थितांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा केली.

मालेतर्फे रोज पाच माजी पदाधिकारी किंवा त्यांच्या वंशजांचा कृतज्ञता म्हणून सत्कार करण्यात येतो. आज माजी पदाधिकारी ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल शाह, राजाभाऊ वर्टी, मंदार लोणकर, अनिल नवले, भूषण काळे यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वक्ते डॉ. गंगाखेडकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून ऋतुरंगचे विजय संकलेचा यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कॅन्सरबाबत काळजी घ्या : डॉ. पाटील
मालेच्या दुस-या सत्रात हार्ट संजीवनी सेंटरचे संचालक डॉ. संजय पाटील यांनी ‘सायटोट्रॉन -कॅन्सरकरिता क्रांतीकारक उपचार पद्धती’ याविषयी मार्गदर्शन करताना कॅन्सर होऊ नये, याविषयी मार्गदर्शन केले. कॅन्सरवरील पारंपारिक उपचार पद्धतीत आता नवीन तंत्रज्ञान आले असून ते जगात तीस ठिकाणी तर भारतात केवळ तीन ठिकाणी उपलब्ध असल्याचे सांगतानाच ते तंत्र आता नाशकातही उपलब्ध असल्याचे सांगितले.

आजचे व्याख्यान-वक्त्या- ब्रह्माकुमारी संतोषदिदी,
माऊंटअबूव दुर्ग अभ्यासक सुदर्शन कुलथे, नाशिकवेळ-सायं. ७ वा.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!