prsanna

SBIचे महत्वाचे अपडेट:दोन हजाराची नोट बदलण्यासाठी फॉर्म लागणार का?ओळखपत्र लागणार का?

0

नवी दिल्ली,दि.२१ मे २०२३ – भारतात लागू असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. नुकतीच या बाबत घोषणा झाली असली तरी सर्वसामान्य नागरिकांकडे या दोन हजारच्या नोटा बोटावर मोजता येतील एवढीच शिल्लक असावी असं एका सर्व्हेतून समोर आले आहे.दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना तीन महिन्यांचा कालावधी म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.

नोटा बदल्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागणार आहे का ? बँकेत अकाउंट असणे गरजेचे आहे का ? असे एक आणि अनेक प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडले आहेत. स्टेट बँकेने रविवारी नोटा बदलण्यासंदर्भात एक गाइडलाइन जारी केली. त्यात नोट बदलण्यासाठी कोणताही फॉर्म भरण्याची किंवा ओळखपत्र देण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. तसेच एका वेळेस फक्त दहा नोटाच बदलता येणार आहे. कोणत्याही बँकेत जाऊन या नोटा बदलता येणार असे चालणार आहे. त्यासाठी बँकेत खाते असण्याची गरज नसली तरी नोटा भरताना बँकेत KYC करावी लागणार असल्याचे समजते आहे. मात्र तुमचे त्या बँकेत खाते असेल तर त्यामध्येही ही रक्कम जमा करु शकतात पण त्या खात्याची KYCअसणे गरजेचे आहे.नोटा बदलण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.

एका वेळी २० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत,२००० रुपयांच्या नोटा बदलता येतील.तसेच खातेदाराला दररोज ४,००० रुपयांच्या मर्यादेपर्यंत बीसीद्वारे २,००० रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण केली जाऊ शकते.२३ मे २०२३ पासून सर्व बँकांच्या शाखामध्ये नोटा बदलता येणार आहे.कोणत्याही बँकेच्या शाखेत एका वेळी २० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलू शकतात.त्यासाठी एक्सचेंजची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाईल.

त्यामुळे आता नागरीकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत कोणत्याही बँकेत जाऊन नोटा बदलता येणार आहे.आरबीआयने ३० सप्टेंबर २०२३पर्यंत दोन हजारच्या नोटा चलनात कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. तोपर्यंत या नोटा बदलून घेण्याचा सल्ला दिला आहे.असं जरी असले तरी नोटा बदलायला येणाऱ्या ग्राहकांचे ट्रॅक रेकॉर्ड बँके कडे असणार आहे.त्यामुळे नोटांचा साठा करणारे नक्कीच सापडतील अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरीकांमध्ये आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!