नाशिक विमानतळावरून १ जून पासून देशातील अनेक शहरांसाठी कनेक्टिंग फ्लाइट
'इंडिगो' विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर
नाशिक,दि.२१ जून २०२३-‘इंडिगो’ कंपनी येत्या १ जून पासून ओझर येथून देशातील अनेक शहरांसाठी कनेक्टिंग फ्लाइट सुरू करीत असून,तिचे बुकिंग सुरू झाले आहे.या आधी कंपनीने १५ मार्च पासून सुरु केलेल्या नागपूर,अहमदाबाद व गोव्यासाठी सेवा सुरु केल्या होत्या त्याला नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिल्या मुळेच कंपनीने अहमदाबाद हैदराबाद इंदोर अशा ३ शहरांसाठी नवीन विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे १ जून पासून नाशिक विमानतळावरून ६ शहरांसाठी थेट विमानसेवा तसेच देशातील जवळपास १९ शहरात जाण्यासाठी कनेक्टिंग फ्लाइट उपलब्ध होणार आहे
इंडिगो कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आता बेंगळुरू,जम्मू,चंदीगड,चेन्नई,नवी दिल्ली,हैदराबाद, इंदूर,कोलकाता,तिरुअनंतपुरम,जयपूर,कोची,वाराणसी या शहरांसाठी कनेक्टिंग फ्लाइट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.नवीन वेळापत्रकानुसार देशातील अनेक शहरांची कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या विमानसेवेचा जिल्ह्याच्या उद्योग,कृषी,पर्यटन,धार्मिक,आय टी इंडस्ट्री आदी अनेक क्षेत्रांना मोठा फायदा होणार असल्याचे निमा,आयमा एव्हिएशन कमिटी चेअरमन आणि मी नाशिककर चे संस्थापक मनीष रावल यांनी सांगितले.नाशिकहुन विमानसेवा सुरु करण्यासाठी रावल आणि त्यांच्या सहकार्यांनी सात्यत्याने पाठपुरावा केला आहे.
‘इंडिगो’ कंपनी येत्या १ जून पासून ओझर येथून कनेक्टिंग फ्लाइटचा पर्याय उपलब्ध केला असून, तिचे बुकिंग सुरू झाले आहे. वेळापत्रकानुसार आता बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, नवी दिल्ली, हैदराबाद, इंदूर, कोलकाता, तिरुअनंतपुरम, जयपूर, कोची, वाराणसी या शहरांसाठी कनेक्टिंग फ्लाइट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या सर्व सेवा रोज दिल्या जाणार असून, बहुतांश फ्लाइट अहमदाबाद येथून उपलब्ध होणार आहेत, तर एक फ्लाइट गोव्यातून मिळणार आहेत. या कनेक्टिंग फ्लाइट असून, त्यासाठी अहमदाबाद येथे काही तासांची प्रतीक्षा करावी लागणार असली, तरी या शहरांना हवाईमार्गे जाण्यासाठी सध्या नाशिककरांना मुंबई गाठावी लागते. त्यात सुमारे चार तासांचा वेळ जातो. त्याऐवजी कनेक्टिंग फ्लाइटचा पर्याय चांगला ठरू शकेल,असे ही निमा ,आयमा एव्हिएशन कमिटी चेअरमन आणि मी नाशिककर चे संस्थापक मनीष रावल यांनी सांगितले.
१ जून पासून सुरु होणाऱ्या कनेक्टिंग फ्लाइटचे वेळापत्रक
Why is Aurangabad being ignored post COVID. Flights withdrawn….no evening service to Mumbai, no service to Chennai, no service to Ahmedabad, horrendously early morning flights to Mumbai with no way of getting back on the same day.
[…] पायलटने प्रसंगावधान राखून आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. विमानात एकूण 227 […]