सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये होणार मैत्रीचं सेलिब्रेशन

0

मुंबई – झी मराठीवरील ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ चे नवीन पर्व अल्पावधीत लोकप्रिय होऊन स्पर्धेतील १४ स्पर्धक रसिकांचे लाडके बनले आहेत.लिट्ल चॅम्प्स आपल्या सादरीकरणा मुळे सर्व रसिकांना मंत्रमुग्ध करत आहेत. यांच्या उत्तम परफॉर्मन्सने पंचरत्न देखील प्रचंड खुश आहेत. आज पर्यंत रसिकांच्या आवडत्या लिटिल चॅम्प्सना गोल्डन तिकीट मिळालं असून अनेकांनी परफॉर्मर ऑफ द वीक होण्याचा बहुमान देखील मिळाला आहे.

सारेगमप लिटिल चॅम्प्समधील येणाऱ्या भागात मैत्रीचं सेलिब्रेशन होणार आहे आणि दोस्ती यारीचा जल्लोषही होणार आहे. या विशेष भागासाठी सारेगमपमधील काही स्पर्धक या सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या मंचावर येणार आहे. जुईली जोगळेकर, शमिका भिडे, सागर फडके, अवंती पटेल आणि शाल्मली सुखटणकर हे पुन्हा एकदा सारेगमपच्या मंचावर आपल्या सुरांची जादू रसिकांना देण्यासाठी सज्ज होणार आहेत. यांच्यासोबत आपले पंचरत्न देखील आपल्या जुन्या आठवणींना उजाळादेणार आहेत. या विशेष भागाची सुरुवात पंचरत्न आणि या स्पर्धकांच्या एका धमाकेदार परफॉर्मन्सने होणार आहे. या भागात लिटिल चॅम्प्स देखील धडाकेबाज परफॉर्मन्सेस सादर करणार आहेत. विशेष म्हणजे धमाल, मजा, मस्तीने रंगलेल्या या भागात रव्याचा लाडू म्हणजेच आपल्या सर्वांची आवडती स्वरा जोशी लिटिल चॅम्प्स मधील काही स्पर्धकांची नक्कल करणार आहे.

हे मैत्रीचे सेलिब्रेशन सारेगमप लिटील चॅम्प्स मध्ये गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता आपल्याला झी मराठीवर बघता येणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.