अभिनेत्री परिणीती चोप्रा खासदार राघव चड्ढा विवाह बंधनात 

0

उदयपूर,दि. २५ सप्टेंबर २०२३ – अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांचा विवाहसोहळा २४ सप्टेंबरला राजस्थान मधील उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये अतिशय थाटामाटात पार पडला. .या वर्षाच्या सुरुवातीला या जोडप्याने एंगेजमेंट केली होती.त्यांचा लग्न सोहळा प्रसिद्ध वेडिंग डेस्टिनेशनवर पार पडला.

खास पाहुण्याच्या उपस्थितीत परिणीची आणि राघव यांनी यावेळी लग्नगाठ बांधली आणि पाहता पाहता नवदाम्पत्याची पहिली झलक टीपण्यासाठी अनेकांचीच घाई झाली.

या समारंभात सेहराबंदी आणि जयमाला यांसारख्या पारंपारिक विधींचा समावेश होता. या लग्नाला सानिया मिर्झा आणि हरभजन सिंगसह अनेक सेलिब्रिटी पाहुणे उपस्थित होते. या जोडप्याच्या लग्नाआधीचे उत्सव ९० च्या दशकाच्या थीमवर आधारित संगीत रजनीचे आयोजन  केले होते. हातावर रंगलेली मेहंदी, कपाळी कुंकू आणि चेहऱ्यावर असणारा आनंद परिणीतीचं सौंदर्य आणखी खुलवून जात होता. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये राघव चड्ढा हेसुद्धा सुटाबुटात रुबाबदार दिसत होते. हा फोटो लग्नानंतरच्या पार्टीतील असल्याचं म्हटलं जात आहे. जिथं परिणीतीनं वेस्टर्न टच असणारी साडी नेसल्याचं पाहायला मिळालं. बेबी पिंक रंगाची छटा असणारी ही साडी,गळ्यासरशी असणारा मोठा नेकलेस तिच्या सौंदर्यात भर टाकत होता. तर, परिणीतीच्या हातात असणारा चुडा भलताच भाव खाऊन गेला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.