नाशिकचे ज्येष्ठ वकील ॲड.एम.टी.क्यू.सैय्यद यांचा “दिपस्तंभ”पुरस्काराने गौरव

0

नाशिक – महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेनेआयोजीत केलेल्या पुणे येथील “राज्यस्तरीय वकील परिषद २०२४” या परिषदेत ३० ते ४० वर्षांपेक्षा जास्त काळ वकीली व्यवसायात आपले ज्ञानार्जन व योगदान दिलेल्या ज्येष्ठ वकीलांना “दीपस्तंभ” पुरस्कार देवुन सन्मानीत करण्यात आले.

यामध्ये  ज्येष्ठ वकीलांमध्ये आपले नाशिकचे ज्येष्ठ वकील मा. श्री. एम.टी. क्यू. सैय्यद सर यांचा त्यांचे वकीली क्षेत्रातील योगदानासाठी मा. न्या. श्री. अभय ओक साो. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांचे शुभहस्ते करण्यात आला. श्री. एम.टी.क्यू. सैय्यद सर हे सन १९८६ पासून दिवाणी, फौजदारी व बँकिंग क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे, शैक्षणिक व सामाजिक कार्यात स्वतःला झोपवुन देणारे अफलातुन व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलु आपल्याला दिसून येतात.

या समारंभास न्यायमुर्ती व वकील वर्ग यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या सोहळ्यास मा.न्या. प्रसन्ना वराळे साो. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली हे उपस्थित होते. तसेच मा. न्या. श्री. देवेंद्र उपाध्याय साो. मुंबई उच्च न्यायालय, मुंबई हे उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र सरकारचे मा. उद्योगमंत्री श्री. उदय सामंत साो.. तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मा. न्या. श्री. नितीन जामदार साो, मा. न्या. श्री. के. आर. श्रीराम साो., मा. न्या. श्रीमती. रेवती मोहिते डेरे मॅडम, मा.न्या. श्री. नितीन सांबरे साो., मा. श्री. आरिफ डॉक्टर साो. तसेच अॅडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र मा. श्री. डॉ. बिरेंद्र सराफ साो. अॅडव्होकेट जनरल ऑफ गोवा मा. श्री. देविदास पंगम साो., बार कौन्सील ऑफ इंडीयाचे चेअरमन व राज्यसभेचे नुकतचे निवडून आलेले मा. श्री. मननकुमार मिश्रा साो., व्हाईस चेअरमन श्री. एस. प्रभाकरन साो. व पी.डी.जे. पुणे मा. श्री. महेंद्र के. महाजन साो. हे उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.