Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू
ब्लॅक बॉक्स सापडल्याने अपघाताच्या चौकशीला वेग
अहमदाबाद, दि. १३ जून २०२५ – Ahmedabad Plane Crash गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केलेले एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलायनर ७८७ विमान अवघ्या काही सेकंदांत कोसळले. या भयानक दुर्घटनेत एकूण २६५ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकृत वृत्त आहे.
या दुर्घटनेत, २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा, तर विमान कोसळलेल्या मेघानीनगर परिसरातील २४ नागरिकांचाही मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.एकजण दैव बलवत्तर म्हणून बचावला तर भूमी चौहान या महिला ट्रॅफिकमुळे १० मिनिटं उशिरा पोहोचल्यामुळे फ्लाईट चुकली आणि चमत्कारिकरित्या त्यांचा जीव वाचला.
✈️ ब्लॅक बॉक्स सापडला – अपघाताच्या कारणांचा उलगडा होणार (Ahmedabad Plane Crash)
दुर्घटनाग्रस्त विमानाचा एक ब्लॅक बॉक्स अधिकाऱ्यांना सापडला आहे. यात फ्लाइट डेटा आणि कॉकपिट रेकॉर्डिंग असून, विमानाच्या अपघातामागील नेमकं कारण शोधण्यासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे. हे यंत्र प्रचंड उष्णता, आग, पाणी आणि दाब सहन करू शकतं आणि दुर्घटनांनंतर प्रथम शोधले जाणारं घटक मानलं जातं.
✈️ एअर इंडिया अपघाताची ४ संभाव्य कारणं
विशेष तज्ञांनी पुढील चार शक्यता मांडल्या आहेत:
दोन्ही इंजिन्समध्ये एकाच वेळी बिघाड
लँडिंग गियर वेळेवर न उघडणे
पक्ष्यांशी धडक
टेक ऑफ करताना फ्लॅप्स योग्य स्थितीत नसणे
मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांनी उड्डाण घेतल्यानंतर तातडीने “मे-डे कॉल” दिला होता, पण केवळ ५० सेकंदांत विमान कोसळले.
🕯️ महाराष्ट्रातील १० जणांचा मृत्यू
भीषण अपघातात महाराष्ट्रातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात क्रू मेंबर व प्रवासी यांचा समावेश आहे:
✈️ क्रू मेंबर्स:
सुमीत सभरवाल – मुख्य वैमानिक (पवई, मुंबई)
दीपक पाठक – (बदलापूर)
मैथिली पाटील – (न्हावा, पनवेल)
रोशनी सोनघरे – (डोंबिवली)
अपर्णा महाडिक – (गोरेगाव)
साईनीता चक्रवर्ती – (जुहू)
🧳 प्रवासी:
मयूर पाटील – (माहिती प्रलंबित)
यशा कामदार – (नागपूर)
आशा पवार आणि महादेव पवार – दाम्पत्य (पंढरपूर)
सध्या ५ मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
भारताच्या विमान इतिहासातील सर्वात मोठा अपघात?
या अपघाताला भारताच्या हवाई इतिहासातील सर्वात भीषण अपघात म्हणून ओळखले जाऊ शकते. घटनास्थळी अजूनही मदत कार्य सुरु असून, दुसरा ब्लॅक बॉक्स आणि अधिक पुरावे मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.