अहमदाबादमध्ये भीषण विमान अपघात;२४२ प्रवासी असलेल्या विमानाला टेकऑफनंतर कोसळले
मोठी जीवितहानी शक्य:माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी या विमानात?
अहमदाबाद, दि. १२ जून २०२५ —Ahmedabad Plane Crash Today गुजरातच्या अहमदाबाद शहरात आज सकाळी एक भीषण विमान अपघात झाला आहे. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या सात मिनिटांत, एअर इंडियाचे Boeing Dreamliner 787 विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. या विमानात एकूण २४२ प्रवासी आणि १२ कर्मचारी होते. अपघात होताच परिसरात आग लागली आणि प्रचंड धुराचे लोट उठले.
माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी या विमानात? (Ahmedabad Plane Crash Today)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील या विमानात प्रवास करत होते. त्यांचा बोर्डिंग पास सोशल मीडियावर समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्याबाबत अधिकृत माहिती अजून मिळालेली नाही. या घटनेत मोठ्या जीवितहानीची शक्यता वर्तवली जात असून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
टेकऑफनंतर १५ किमी अंतरावर दुर्घटना
हे विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने रवाना झालं होतं. टेकऑफनंतर केवळ काही मिनिटांतच ते मेघानीनगर परिसरात १५ किमी अंतरावर कोसळलं. विमानाला तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर विमानानं आग पकडली, आणि एका इमारतीवर जाऊन धडक दिली, त्यामुळे त्या परिसरातही मोठं नुकसान झालं आहे.एअर इंडियाचे AI171 हे प्रवासी विमान लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे मार्गस्थ झाले होते. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळवरून उड्डान घेतलेले हे विमान उड्डाणानंतर काही क्षणात मेघानीनगर भागातील डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले. या विमानामध्ये 230 प्रवाशांसह १२ क्रू मेंबर होते.
बचावकार्य सुरू, विमानतळ बंद
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचं काम सुरू आहे. धुराचे लोट धारपूर भागातसुद्धा दिसले आहेत. विमानातील एक पंख वेगळा झाला असून संपूर्ण विमानाचा बहुतांश भाग भस्मसात झाला आहे. अहमदाबादमधील विमानतळ तातडीने बंद करण्यात आला आहे आणि दिल्लीहून येणारी सर्व विमानं रद्द करण्यात आली आहेत.
#WATCH | Debris at Air India plane crash site in Ahmedabad; Fire Services and other agencies present at the site pic.twitter.com/z9XsemwDnx
— ANI (@ANI) June 12, 2025
रुग्णालयांत आपत्कालीन तयारी
घटनास्थळाजवळील रुग्णालयातील सर्व डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. जखमींवर तातडीने उपचार सुरू असून, सरकारकडून अद्याप कोणताही अधिकृत मृत्यू किंवा जखमींचा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही.
साक्षीदारांचे वर्णन
सामाजिक माध्यमांवर अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी सांगितलं की विमान जमिनीवर कोसळताच मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण परिसर धुरामय झाला.
विमानातील प्रवाशांची माहिती
आज दुपारी एक भीषण विमान अपघात घडला असून, एअर इंडियाचे २४२ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळले. हे विमान अहमदाबादहून लंडनसाठी दुपारी १.३१ वाजता उड्डाण करत होते, परंतु काहीच मिनिटांत त्याचे नियंत्रण सुटल्याने ते कोसळले.
या विमानात एकूण २४२ प्रवासी होते, ज्यात १२ क्रू मेंबर्स,तसेच गुजराचे माजी मुख्यमंत्री विजय रूपांणी यांच्यासह २ नवजात बाळं, ११ लहान मुले आणि २१७ प्रौढ प्रवाशांचा समावेश होता. प्रवाशांमध्ये १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे ७ आणि कॅनडाचा १ नागरिक होता.
या दुर्घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावरही खळबळ उडाली असून, ब्रिटनचे पंतप्रधान रिषी सुनक यांनी ट्विटरवरून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे, या १२ क्रू मेंबर्सपैकी एक महिला महाराष्ट्राची नागरिक होती, असे समजते. सध्या बचावकार्य सुरु असून अधिकृत तपशीलाची प्रतीक्षा आहे.
ही घटना अतिशय गंभीर असून प्रशासनाकडून अद्याप तपशीलवार माहितीची वाट पाहिली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणांचा आधार घ्यावा.
[…] […]
[…] […]