‘आयमा इंडेक्स-2025’ला लाखोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; तुफानी गर्दीत प्रदर्शनाची भव्य सांगता  

0

नाशिक,दि,१ डिसेंबर २०२५ –  AIMA Index 2025 अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)तर्फे त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम येथे आयोजित चार दिवसांच्या आयमा इंडेक्स-2025 या विराट औद्योगिक प्रदर्शनाचे सूप वाजले. प्रमुख पाहुणे म्हणून एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, जिल्हा उद्योग केंद्राच्या सहसंचालक वृषाली सोनी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी निंबाजी भड, बीएसएनएलचे महाव्यवस्थापक सारंग मांडवीकर तर व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष ललित बूब, इंडेक्स चेअरमन वरूण तलवार, सरचिटणीस प्रमोद वाघ, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे,उमेश कोठावदे,बीओपीपी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, आयपीपी निखिल पांचाळ,सचिव हर्षद बेळे, निमाचे अध्यक्ष आशिष नहार आदी होते.त्यांच्या हस्ते प्रयोजक, स्टॉलधारकांचा तसेच स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला.  

आयमाचे प्रदर्शन अतिसुंदर झाले. दरवर्षी हे प्रदर्शन भरवावे अशी अपेक्षा प्रमुख पाहुण्या आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या सहसंचालिका वृषाली सोनी यांनी व्यक्त केली. आयमाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य होता. नाशकात आयमसह विविध संघटनांमध्ये असलेला समन्वय वाखाण्याजोगा असल्याचे एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले. हे प्रदर्शन यशस्वी करण्यास सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांना आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात मनापासून धन्यवाद दिले.

उद्योजकांचा भरभरून प्रतिसाद (AIMA Index 2025)

तीन वर्षांनंतर झालेल्या प्रदर्शनाला उद्योजकांचा भरभरून प्रतिसाद तर लाभलाच परंतु चार दिवसांत लाखाहून अधिक लोकांनी प्रदर्शन बघण्यास गर्दी करून आयोजकांना सुखद धक्का दिला. या प्रदर्शनामुळे येत्या काही दिवसात कोट्यवधीची गुंतवणूक नाशकात येण्याची शक्यता बळावली आहे. राजकीय नेते आणि शासकीयसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या भेटी आणि विविध विषयांवरील परिसंवाद,ड्रोन शो,गोदा आरती, ढोल ढोल पथकाचे प्रात्यक्षिक आदी सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रदर्शनाची रंगत अधिकच वाढली होती.कनेक्ट, कोलॉब्रेट अँड क्रिएट ही थीम घेऊन भरविण्यात आलेल्या या औद्योगिक प्रदर्शनात अभियांत्रिकी,मशीन टूल्स,मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक उपभोग्य वस्तू,आयटी,आयटीएस, ऑफिस ऑटोमेशन,अपारंपरिक उर्जा,बँकिंग,विमा आणि वित्त, शिक्षण आणि पर्यटन,खास आकर्षण म्हणजे ईव्ही व एआयची विविध प्रकारची उत्पादने तसेच ईव्ही वाहने आणि एआय उत्पादने या विषयी 3755हून अधिक स्टॉल्स होते.अत्याधुनिक यंत्रसामुग्री बरोबरच नाविन्यपूर्ण उत्पादित केलेल्या  उदयोन्मुख उद्योजकांचे नवनवीन कलाविष्कार बघण्याची संधीही लोकांउद्योजकांना सहाय्यभूत ठरणारे व नाशिकमध्ये गुंतवणुकीला पूरक वातावरण निर्माण होण्यासाठी  विविध उपक्रम राबवून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.अनेक बड्या कंपन्या वेंडर्स मिळाले. रोजगार निर्मितीच्या अनेक संधी या प्रदर्शनाने उपलब्ध झाल्या.कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे चित्रही प्रदर्शनात बघायला मिळाले.

प्रदर्शन यशस्वी करण्यास सचिव योगिता आहेर,खजिनदार गोविंद झा,आयपीपी निखिल पांचाळ,दिलीप वाघ,अविनाश मराठे,जयदीप अलिमचंदानी,जगदीश पाटील,हेमंत खोंड,रवींद्र झोपे,अविनाश बोडके,मनीष रावळ,रवींद्र महादेवकर,राहुल गांगुर्डे,जयंत पगार,कुंदन डरंगे,धीरज वडनेरे,अभिषेक व्यास श्रीलाल पांडे,अजय यादव,रवी शामदासांनी,विनोद कुंभार,श्वेता चांडक,अलोक कानांनी,नागेश पिंगळे,करणसिंग पाटील, रणजित सानप,सूरज आव्हाड,सुमित तिवारी,कमलेश उशीर, वेदांत राठी,मनोज मुळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!