नवी दिल्ली -सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाची मालकी आता टाटा समूहाकडे गेली आहे. आज अधिकृतपणे टाटांनी एअर इंडियासाठी लावलेली बोली जिंकल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. टाटा सन्सने एअर इंडियासाठी १८ हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. तर दुसरे खरेदीदार असलेल्या अजय सिंह यांच्या स्पाईसजेटने एअर इंडियासाठी १५१०० कोटी रुपयांची बोली लावली होती. एअर इंडिया पुन्हा एकदा टाटा समुहाकडे परतल्यानंतर टाटा समुहाचे चेअरमन रतन टाटा यांनी ट्वीट करत या निर्णायाचे स्वागत केले आहे. त्यांनी Drink back, Air India असं ट्वीट केलं आहे.
टाटा समूह आणि स्पाइसजेटचे अजय सिंह यांनी एअर इंडियासाठी बोली लावलीहोती.अलीकडेच ब्लूमबर्गने अहवालात म्हटले होते की पॅनलने एअर इंडियासाठी टाटा ग्रुपची निवड केली आहे. डिसेंबरपर्यंत टाटा समूहाला एअर इंडियाचा मालकी हक्क मिळू शकतो. जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली. आता ६८ वर्षांनंतर टाटा समूहाने सर्वाधिक बोली लावून एअर इंडिया परत खरेदी केली आहे.