पुष्पा-2 मधील अल्लू अर्जुनच्या लूकनं वेधलं चाहत्यांचे लक्ष :बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज
पहा Pushpa 2 चा Trailer
नवी दिल्ली,दि. ८ एप्रिल २०२३- ‘मैं झुकेगा नहीं साला’ या डायलॉगने फेमस झालेल्या अल्लू अर्जुनचा पुष्पा अवतार प्रेक्षकांना पुन्हा पहायला मिळणार आहे.पुष्पाच्या निर्मात्यांनी सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. शुक्रवारी म्हणजेच ७ एप्रिल रोजी ट्विटरवर निर्मात्यांनी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज केला आहे.पुष्पा-2 मध्ये काही बॉलिवूडमधील कलाकार देखील काम करणार आहेत, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटात सलमान खान आणि अजय देवगण हे महत्वाची भूमिका साकारतील, असंही म्हटलं जात आहे.
पुष्पा-2 या चित्रपटातील लूकचा फोटो अल्लू अर्जुननं ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो खास लूकमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये अल्लू अर्जुनच्या गळ्यात लिंबाची माळ दिसत आहेत. तसेच या फोटोमध्ये त्यानं भरजरी साडी देखील नेसलेली दिसत आहे. कानात झुमके, हातात बांगड्या अन् गळ्यात ज्वेलरी अशा अल्लू अर्जुनच्या लूकनं त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन अल्लू अर्जुनच्या या लूकचे कौतुक केले आहे.
#Pushpa2TheRule Begins!!! pic.twitter.com/FH3ccxGHb8
— Allu Arjun (@alluarjun) April 7, 2023
पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली आणि पुष्पाची केमिस्ट्री चांगलीच जुळली होती. चाहत्यांना या दोघांची केमिस्ट्रीचांगलीच भावली. टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर हा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. हायव्होल्टेज ड्रामा आणि थ्रिलने परिपुर्ण अशा चित्रपटासाठी आता मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. एका तासात ट्रेलरला लाखाहून अधिक व्हूज मिळाले आहेत. त्यामुळे आता चित्रपट हाऊसफूल होण्याची शक्यता आहे.
पहा Pushpa 2 चा Trailer: