‘आंबट शौकीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला –धमाल ट्रेलर प्रदर्शित

0

मुंबई, २८ मे २०२५ – Ambat Shaukeen Marathi Movie  मराठी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची धमाल मेजवानी घेऊन येत आहे ‘आंबट शौकीन’ हा नवीन चित्रपट.ललित, वरुण आणि रेड्डी या तीन अतरंगी मित्रांची भन्नाट गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

त्रिकुटाची धमाल कहाणी: (Ambat Shaukeen Marathi Movie)
ट्रेलरमध्ये या तिघांची मस्ती, मजा आणि नात्यांतील गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. प्रेम, मैत्री, सोशल मीडियाच्या आभासी दुनियेमुळे हरवलेली स्वतःची ओळख आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक गुंत्यांची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते.

दिग्गज कलाकारांची फौज:
या चित्रपटात पूजा सावंत, अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, किरण गायकवाड यांच्या प्रमुख भूमिका असून प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत, राहुल मगदूम हे सुद्धा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

चित्रपट मागचं टीमवर्क:
चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले असून कथा देखील त्यांचीच आहे. निर्मात्यांच्या यादीत प्रफुल्ल काकाणी, रंजना मोहित लखोटिया, अनघ भुतडा व निलेश राठी यांचा समावेश आहे. पटकथा आणि संवाद अक्षय टंकसाळे व अमित बेंद्रे यांनी लिहिले आहेत.

दिग्दर्शकाचे मत:
निखिल वैरागर म्हणतात, “‘आंबट शौकीन’ ही फक्त मैत्री आणि प्रेमाची गोष्ट नाही, तर आजच्या तरुणांच्या भावनिक वास्तवावर भाष्य करणारी कथा आहे. सोशल मीडियाच्या दुनियेमुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीवर हसत-हसत अंतर्मुख होणारा प्रवास दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा?:
‘आंबट शौकीन’ हा चित्रपट येत्या १३ जून २०२५ रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!