गिरणा गौरव पुरस्काराची घोषणा
पद्मश्री निलिमा मिश्रा, गुरु ठाकुर, राजन गवस,सुमती लांडे,वैशाली बालाजीवाले, मच्छिंद्रनाथ कदम,मोरे,डॉ.अनिल निकम ,शंभु पाटील, देशमुख यांचा समावेश
नाशिक (प्रतिनिधी)- गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारे उत्तर महाराष्ट्राचा मानाचा स्तंभ म्हणून ओळखले जाणारे *गिरणा गौरव पुरस्कार* यंदा सामाजिक कार्यकर्त्या व समाजसेविका पद्मश्री रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या निलीमा मिश्रा(जळगाव) ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस(कोल्हापूर) गीतकार चित्रकार दिग्दर्शक गायक गुरु ठाकूर (मुंबई) सुप्रसिद्ध प्रकाशिका ,कवयित्री सुमतीताई लांडे(अहमदनगर) दैनिक देशदुतच्या उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या महिला संपादिका वैशाली बालाजीवाले आदर्श शिक्षणाधिकारी मच्छिंद्रनाथ कदम (नंदुरबार) नाटककार शंभू पाटील (जळगाव)डॉ. अनिल निकम (नाशिक)यांच्यासह पाच जणांना यंदाचा गिरणा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती निवड समितीचे अध्यक्ष कवी राजू देसले यांनी दिली.
येत्या५ एप्रिल रोजी२०२२ सांय नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिर मध्ये मँगेसेसे पुरस्कार विजेते जलतज्ञ डॉ. राजेन्द्र सिंह यांच्या शुभ हस्ते व आनंद अँग्रो चे चेअरमन उद्धव आहेर यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती निवड समितीच्या वतीने देण्यात आली निवड समितीच्या झालेल्या बैठकीत या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून मानपत्र स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून या पुरस्काराचे हे २४ वर्षे आहे .
यावेळी निवड झालेल्यांमध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक राजन गवस कोल्हापूर, पद्मश्री सामाजिक कार्यकर्त्या निलिमाताई मिश्रा जळगाव, सुप्रसिद्ध गीतकार ,लेखक गायक चित्रकार गुरु ठाकूर मुंबई,मच्छिंद्रनाथ कदम शैक्षणिक कार्यात विशेष योगदान(नंदुरबार )उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या महिला संपादिका वैशाली बालाजीवाले नाशिक, नाटककार,दिग्दर्शक शंभू पाटील जळगाव,सुप्रसिद्ध प्रकाशिका,कवयित्री सुमतीताई लांडे अहमदनगर,ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणारे डॉ. अनिल निकम ,नाशिक, आदर्श शिक्षक पत्रकार खंडु मोरे (देवळा) सामाजिक महिला साठी योगदान देणारे सौ.शिल्पा देशमुख आदीचा यंदाच्या पुरस्कार मध्ये समावेश आहे. निवड समितीचे अध्यक्ष कवी राजू देसले कवी प्रकाश होळकर डॉ. निर्मोही फडके ,डॉ. स्वप्नील तोरणे ,प्रवीण बांदेकर यांनी गिरणा गौरव पुरस्काराची निवड केली.